KKR Vs MI च्या मॅच मध्ये Mumbai Indians चा पराभव

KKR Vs MI च्या मॅच मध्ये Mumbai Indians चा पराभव

काल झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स वर्सेस मुंबई इंडियन्सच्या मॅच मध्ये मुंबई इंडियन्सचा २४ धावांनी पराभव झाला आहे. कोलकाताला गुंडाळल्यानंतर मुंबईचा डाव १८.५ षटकांत १४५ धावांत संपुष्टात आला. यानंतर मुंबईची खेळी मात्र बिघडली. मुंबई इंडियन्सच्या संघात अनेक नामवंत खेळाडू आहेत. यामध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, ईशान किशन, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह सारखे खेळाडू टीम मध्ये आहेत. मुंबईने खेळलेल्या कालच्या खेळीमुळे अनेकांनी हार्दिकच्या कर्णधारपदावर प्रश्न केले. याचबरोबर संघात संतुलन नसल्याच्या प्रतिक्रिया देखील लोक देत आहेत. या सर्व दरम्यान भारतीय संघाचा माजी खेळाडू मनोज तिवारी याने हार्दिक पांड्याच कौतुक केलं आहे.

मुंबईचा पराभव झाल्यानंतर मनोज तिवारीने ट्विट केले होते. ज्यात तो म्हणाला कि, ‘मुंबई जिंकु दे अथवा हरू दे … मला काहीही फरक पडत नाही. हार्दिक पांड्या उत्तम गोलंदाजी करतोय हे आपल्या भारतीय संघासाठी महत्वाचं आहे. कोलकाताविरोधी हार्दिकने २ विकेट्स घेतल्या पण फलंदाजीमध्ये त्याला एवढे चांगले जमवता आले नाही. हार्दिक एक धाव करत पराभूत झाला. यामागील झालेल्या लखनौ विरोधी मॅच मध्ये देखील हार्दिकने उत्तम कामगिरी केली होती.

केकेआरने पहिल्या खेळात १६९ धाव आपल्या नावावर केल्या होत्या, ज्यासाठी व्यंकटेश अय्यरने ७० धावांची दमदार खेळी खेळली होती. काही काळानंतर टीमने ४६ धावांत ३ विकेट्स गमावल्या होत्या. रोहित शर्माने ११ धावा, ईशान किशनने १३ आणि नमन धीराने ११ च धावा केल्या. सूर्यकुमार ने ३५ चेंडूत ५६ धाव केल्या याचवेळी त्याने ६चौकार आणि २ षटकार देखील केले.

हे ही वाचा:

पुढील ३६ तासांसाठी रेड अलर्ट, मुंबईतील समुद्राच्या लाटा उसळणार

शेतकऱ्याचा आवाज लोकसभेत गेला पाहिजे म्हणत Bachchu Kadu यांचा Raju Shetti यांना पाठिंबा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version