Saturday, May 18, 2024

Latest Posts

पुढील ३६ तासांसाठी रेड अलर्ट, मुंबईतील समुद्राच्या लाटा उसळणार

सध्या सर्वत्र प्रचंड ऊन आहे. अश्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाने आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉर्मेशन यांनी एक माहिती जारी केली आहे. या माहितीनुसार आज शनिवार दिनांक ५ मे रोजी सकाळी साडे ११ वाजल्यापासून रविवार ६ मे रोजी साडे ११ पर्यंत ३६ तासांसाठी समुद्रात उंचच उंच लाटा उसळण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे

सध्या सर्वत्र प्रचंड ऊन आहे. अश्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाने आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉर्मेशन यांनी एक माहिती जारी केली आहे. या माहितीनुसार आज शनिवार दिनांक ५ मे रोजी सकाळी साडे ११ वाजल्यापासून रविवार ६ मे रोजी साडे ११ पर्यंत ३६ तासांसाठी समुद्रात उंचच उंच लाटा उसळण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे. उसळणाऱ्या या लाटांचा समुद्रकिनारपट्टीवर परिणाम होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. या कालावधी मध्ये लाटांची उंची सरासरी ०.५ ते १.५ मीटर इतकी वाढेल असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. तरी येत्या ३६ तासांमध्ये नागरिकांनी समुद्रात जाणे टाळावे व मच्छीमार बांधवांनी सहकार्य करावे असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन तर्फे करण्यात आलेले आहे.

हवामान विभागाने दिलेला हा अलर्ट लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक आणि आयुक्त श्री. भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी महानगरपालिकेच्या सर्व आयुक्त व पोलिसांना काळजी घेण्यासाठी सांगितले आहे. याचबरोबर महानगरपालिकेने नागरिकांना समुद्रकिनारी जाण्यापासून रोखण्यास पोलिसांना सांगितले असून. परिसरात राहत असणाऱ्या नागरिकांना काळजी घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. नागरिकांसोबतच किनारपट्टीवर येणाऱ्या मच्छिमारांसाठी देखील महानगरपालिकेने अलर्ट जारी केला आहे. मच्छीमारांना या कालावधीमध्ये सुरक्षित अंतरावर बोटी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जेणेकरून किनारपट्टीवर लाटा धडकून बोटींचे नुकसान होणार नाही. या संपूर्ण परिस्थितीवर बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अग्निशमन दल तसेच मुंबई पोलीस व इतर यंत्रणा लक्ष ठेऊन आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने समुद्रात जाऊ नये, जास्त आसपास फिरू नये, दक्ष राहावे तसेच नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

हे ही वाचा:

“मी दोन दिवसात स्फोट करेन, तोपर्यंत लाभार्थ्यांनी शांत झोपावे”;संजय राऊतांचा इशारा

Avinash Jadhav यांच्याविरोधात खंडणी, मारहाणीचा गुन्हा दाखल, मारहाणीचा व्हिडीओ आला समोर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss