Saturday, May 18, 2024

Latest Posts

शेतकऱ्याचा आवाज लोकसभेत गेला पाहिजे म्हणत Bachchu Kadu यांचा Raju Shetti यांना पाठिंबा

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी (Raju Shetti) यांना पाठिंबा दर्शवला आहे. शेतकऱ्यांचा आवाज लोकसभेत गेला पाहिजे या भावनेतून राजू शेट्टी यांना पाठिंबा दिल्याचे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले.

बच्चू कडू म्हणाले, “देशामध्ये जी काही परिस्थिती सुरू आहे ती पाहता शेतकऱ्याचा मुलगा, शेतकऱ्याचा आवाज लोकसभेत गेला पाहिजे, या भावनेतून राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला आहे. अमरावती व्यतिरिक्त बाहेर कोणालाही पाठिंबा दिलेला नव्हता. परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला आहे. बच्चू कडू यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा दिल्याची चर्चा सुरू होती. परंतु राजू शेट्टी यांच्याशिवाय राज्यामध्ये इतर कोणालाही पाठिंबा दिला नाही,” असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या सभा महाराष्ट्रात होत आहेत. त्याबद्दल बोलताना बच्चू कडू म्हणाले, “काँग्रेस मुस्लिम आणि बौद्धांचे हित जपणारी पार्टी म्हणून पुढे येत असताना आम्ही हिंदुत्व जपणारी पार्टी आहे. असं देशामध्ये मुद्दाम निर्माण केलं जात आहे. त्यामुळे देशातील मूळ मुद्द्यांना भाजप हात घालत नाही. शेतकऱ्यांसह देशात अनेक मूळ मुद्दे आहेत. गेल्या शंभर दीडशे वर्षांपासून जे षडयंत्र सुरू आहे, त्याला लोक देखील बळी पडतात याचे दुःख आहे.”

केंद्र सरकारने आज कांदा निर्यात बंदीचा निर्णय उठवला. त्यावर भाष्य करत बच्चू कडू म्हणाले, “कांदा निर्यातीवर बंदी करून सरकारच व्यापार करतय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात कांद्याचे पीक कमी प्रमाणात निर्माण झाले. परदेशामध्ये क्विंटलला डॉलर प्रमाणे चांगला दर असतांना देखील निर्यात बंदी करण्यात आली. कांदा निर्यात बंदी धोरणामुळे शेतकऱ्यांचा खूनच झाला आहे.”

हे ही वाचा:

“अजित पवारांना आमच्या बंडाची कल्पना होती”; संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट

Avinash Jadhav यांच्याविरोधात खंडणी, मारहाणीचा गुन्हा दाखल, मारहाणीचा व्हिडीओ आला समोर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss