PAK vs ENG, Final Match : टी२० विश्वचषक २०२२ इंग्लंडचाच, पाकिस्तानवर ५ गडी राखून विजय

इंग्लंडने पाकिस्तानचा ५ विकेट्सनी पराभव करत T20 वर्ल्डकप २०२२ वर आपले नाव कोरले. इंग्लंडने २०१९ चा वनडे वर्ल्डकप देखील जिंकला आहे. आता T20 वर्ल्डकप जिंकत इंग्लंडने इतिहास रचला. इंग्लंडच्या विजयात बेन स्टोक्सने नाबाद ५२ धावा करत मोठे योगदान दिले.

PAK vs ENG, Final Match : टी२० विश्वचषक २०२२ इंग्लंडचाच, पाकिस्तानवर ५ गडी राखून विजय

इंग्लंडने पाकिस्तानचा ५ विकेट्सनी पराभव करत T20 वर्ल्डकप २०२२ वर आपले नाव कोरले. इंग्लंडने २०१९ चा वनडे वर्ल्डकप देखील जिंकला आहे. आता T20 वर्ल्डकप जिंकत इंग्लंडने इतिहास रचला. इंग्लंडच्या विजयात बेन स्टोक्सने नाबाद ५२ धावा करत मोठे योगदान दिले.

T20 विश्वचषक स्पर्धेतील (T20 World Cup 2022) फायनलचा सामना इंग्लंडने ५ विकेट्सनी जिंकत इतिहास रचला आहे. दुसऱ्यांदा T20 विश्वचषकावर इंग्लंडनं नाव कोरलं आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला गेलेला हा पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (PAK vs ENG) T20 विश्वचषक स्पर्धेतील फायनलचा सामना एक लो स्कोरिंग मॅच असूनही चुरशीची असल्याचं पाहायला मिळालं. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेल्या इंग्लंडने आपला निर्णय योग्य असल्याचं दाखवत अवघ्या १३७ धावांमध्ये पाकिस्तानला रोखलं. पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीमुळे 138 धावाचं आव्हान गाठताना इंग्लंडला अवघड झालं. पण त्याचवेळी त्यांचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने एकहाती झुंज देत नाबाद ५२ धावा करत ५ गडी राखून इंग्लंडला विजय मिळवून दिला.

सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकत इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराने घेतलेला गोलंदाजीचा निर्णय बोलर्सनी अगदी योग्य असल्याचं दाखवत अप्रतिम गोलंदाजी करत अवघ्या १३७ धावांमध्ये पाकिस्तानला रोखलं. पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आणि रिझवान यांनी चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. पण १५ धावा करुन रिझवान बाद झाला. मग मोहम्मद हॅरीसही ८ धावांवर बाद झाला. कर्णधार बाबर चांगली फलंदाजी करत होता, पण ३२ धावा करुन तोही तंबूत परतला. इतरही फलंदाज स्वस्तात माघारी परतत होते. पण शान मसूदने फटकेबाजी करत २८ चेंडूत ३८ धावा ठोकत पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा केल्या. इतर फलंदाज खास कामगिरी करु न शकल्याने १३७ धावांवर पाकिस्तानचा डाव आटोपला. इंग्लंडकडून सर्वच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पण अष्टपैलू सॅम करनने ४ ओव्हरमध्ये केवळ १२ धावा देत 3 महत्त्वाचे विकेट्स घेतले. त्याने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली. ख्रिस जॉर्डन आणि आदिल राशीद यांनीही प्रत्येकी २ विकेट्स घेतले. बेन स्टोक्सनं एक महत्त्वाची विकेट घेतली.

हे ही वाचा :

PAK VS ENG T20 WC FINAL : पाकिस्ताने इंग्लंड समोर ठेवले १३८ धावांचे आव्हान

PAK vs ENG: अंतिम सामन्यात पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामान अहवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version