Monday, May 20, 2024

Latest Posts

PAK VS ENG T20 WC FINAL : पाकिस्ताने इंग्लंड समोर ठेवले १३८ धावांचे आव्हान

ऑस्ट्रेलियामध्ये १६ ऑक्टोबरपासून सुरू असणाऱ्या टी-२० विश्वकरंडकात आज पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यात अंतिम सामना चालू आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता पाकिस्तान संघाने इंग्लंडला १३८ धावांचे आव्हान दिले आहे. पाकिस्तानचा निम्मा संघ गारद झाल्यानंतर सॅम करन आणि ख्रिस जॉर्डनने उरलेल्या पाकिस्तान संघाला एका पाठोपाठ एक पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सॅम करनने ४ षटकात १२ धावा देत ३ विकेट घेतल्या. तर ख्रिस जॉर्डनने दोन आणि आदिल राशिदने देखील २ बळी टिपले.

टी २० वर्ल्डकप २०२२ च्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानविरूद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी सावध सुरूवातीनंतर भागीदारी रचण्यास सुरूवात केली. मात्र ही भागीदारी सॅम करनने तोडली. त्याने मोहम्मद रिझवानला १५ धावांवर बाद केले. त्यानंतर आक्रमक फलंदाजी करू पाहणाऱ्या मोहम्मद हारिसला आदिल राशिदने ८ धावांवर माघारी धाडले. पाकिस्तानच्या दोन विकेट स्वस्तात गेल्यानंतर कर्णधार बाबर आझमने शान मसूदच्या साथीने डाव सावरला. ही जोडी धावगती वाढवणार असे वाटत असतानाच राशिदने २८ चेंडूत ३२ धावा करणाऱ्या बाबर आझमची शिकार करत पाकिस्तानला मोठा धक्का दिला. या धक्क्यातून पाकिस्तान सावरण्याचा प्रयत्न करायच्या आतच बेन स्टोक्सने इफ्तिकार अहमदला शुन्यावर बाद करत पाकिस्तानची अवस्था १३ व्या षटकात ४ बाद ८५ धावा अशी केली.

पाकिस्तानची अवस्था ४ बाद ८६ अशी झाली असताना शान मसूदने २८ चेंडूत ३८ धावा करून पाकिस्तानचा डाव सावरला होता. मात्र सॅम करनने त्याला १७ व्या षटकात बाद करत पाकिस्तानला पाचवा धक्का दिला. पाकिस्तानचा निम्मा संघ गारद झाल्यानंतर सॅम करन आणि ख्रिस जॉर्डनने उरलेल्या पाकिस्तान संघाला एका पाठोपाठ एक पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सॅम करनने ४ षटकात १२ धावा देत ३ विकेट घेतल्या. तर ख्रिस जॉर्डनने दोन विकेट टिपल्या. अखेर पाकिस्तानला २० षटकात ८ बाद १३७ धावांपर्यंतच मजल मारता आली.

हे ही वाचा :

Jitendra Awhad: ”महाराज, तुम्हाला शब्द देतो.. तुमचा हा मावळा…” भावनिक होत आव्हाड म्हणाले

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच गोरी नागोरीने केला खुलासा; म्हणाली…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss