Monday, May 20, 2024

Latest Posts

PAK vs ENG: अंतिम सामन्यात पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामान अहवाल

टी २० विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. दोन्ही संघ दुसऱ्यांदा टी-२० विश्वकरंडक जिंकण्याच्या मार्गावर आहेत, परंतु हे सर्व वरुणराजाच्या हाती आहे. या सामन्यात पाऊस आपत्ती ठरू शकतो कारण हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, रविवारी अंतिम फेरीत आणि सोमवारी राखीव दिवशी पावसाचे सावट आहे.

१२ फॉर्म इंग्लंडच्या, तर इतिहास पाकच्या बाजूने अशी स्थिती आहे. द्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्याची. दोन्ही संघ दुसऱ्यांदा टी-२० विश्वकरंडक जिंकण्याच्या मार्गावर आहेत, परंतु हे सर्व वरुणराजाच्या हाती आहे. सोमवारी राखीव दिवशीही पावसाचा अंदाज आहे, परंतु विजेतेपदाचा फैसला होण्यासाठी किमान दहा-दहा षटकांचा तरी खेळ होण्यासाठी संयोजकांची धडपड आहे.

मॅचची आतापासून चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. इंग्लंड टीमने आजच्या मॅचसाठी टीममध्ये बदल केला आहे. मार्क वुड आणि डेविड मलान या दोन खेळाडूंना टीममध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या खेळाडू बाहेर बसवणार हे अद्याप त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. मेलबर्नच्या मैदानात जी टीम चांगला खेळ करेल, त्या संघाचा विजय निश्चित आहे. आजच्या मॅचमध्ये विजयी होणाऱ्या टीमला १३ करोड रुपये मिळणार आहेत. यावेळी टी २० विश्वचषकाची एकूण बक्षीस रक्कम ४५.६८ कोटी रुपये आहे. उपविजेत्या टीमला ६ करोड रुपये मिळणार आहेत. टीम इंडिया आणि न्यूझिलंड टीमला प्रत्येकी ३२.६३ लाख रुपये मिळतील.

इंग्लंड संभाव्य प्लेइंग इलेव्हन : अॅलेक्स हेल्स, जोस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रुक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कॅरेन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड.

हे ही वाचा :

भारत जोडो यात्रेचा ७ वा दिवस; २५० लेखक आणि कलाकारांचा पाठिंबा

शशी थरूर यांचं मोठं वक्तव्य; ज्यांच्यात लढण्याची हिंमत आहे ते …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss