जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, ५ जवान जखमी तर एक शहीद

हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना उधमपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. एअरफोर्स वर झालेल्या हल्ल्याचे फोटो देखील समोर येत आहेत. यामध्ये वाहनावर झालेल्या गोळीबाराच्या खुणा स्पष्ट दिसून येत आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, ५ जवान जखमी तर एक शहीद

शनिवारी जम्मू काश्मीर मधील पूंछ जिल्ह्यात सुरक्षा दलावर हल्ला झाल्याची बातमी समोर येत आहे. भारतीय हवाई दलाच्या वाहनावर हा दहशतवादी हल्ला झालेला आहे. यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा आता अलर्ट मोड वर आली आहे. शनिवारी दहशतवाद्यांनी भारतीय वायू सेनेच्या एका वाहनावर तसेच सुरक्षा दलाच्या ताफ्यावर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये ५ जवान जखमी झाले. या गोळीबारादरम्यान एक जवान शहिद झाल्याची माहिती देखील समोर येत असून याशिवाय आणखी एक जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर येत आहे.

एका बसमधून हवाई दलाचे जवान जम्मू काश्मीर येथून चालले असता हा हल्ला झाला. देशात निवडणुकीचे वारे वाहत असताना हा हल्ला घडल्याने सुरक्षा यंत्रणेने हाय अलर्ट जारी केला आहे. याचबरोबर कडक बंदोबस्त देखील करण्यात आला आहे. सर्व पोलीस व सुरक्षा यंत्रणांद्वारे शोधमोहीम चालू असून हल्ल्यानंतर हवाई दलाची वाहने सुरक्षित भागात हलवण्यात आली आहेत. झालेल्या या हल्ल्यात लष्कराचे जवान जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीर मधील पूंछ येथील सुरनकोट या गावामध्ये हा हल्ला झाला आहे. गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस दल व सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. घटना झालेल्या स्थळी नाकाबंदी करण्यात आली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना उधमपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. एअरफोर्स वर झालेल्या हल्ल्याचे फोटो देखील समोर येत आहेत. यामध्ये वाहनावर झालेल्या गोळीबाराच्या खुणा स्पष्ट दिसून येत आहेत.

शनिवारी सकाळी एका सरकारी शाळेजवळ दहशतवाद्यांनी एमईएफ आणि आयएएफ वाहनांवरती गोळीबार केला. ही घटना अनंतनाग- राजौरी-पूंछ लोकसभा मतदारसंघामध्ये घडली आहे. इथे मतदान २५ मे रोजी होणार आहे. यापूर्वीदेखील जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा येथे जवानांनी एक दहशतवाद्यांचा अड्डा उद्धवस्त केला आहे. तेथून मोठ्या प्रमाणात दारुगोळा देखील जप्त करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

घरच्या घरी बनवा लिप बाम आता विकत घ्याची गरज नाही

PM Narendra Modi जीवन हे एका खुल्या पुस्तकासारख आहे – Devendra Fadnavis

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version