Saturday, May 18, 2024

Latest Posts

घरच्या घरी बनवा लिप बाम आता विकत घ्याची गरज नाही

उन्हाळ्यात त्वच्या कोरडी पडते पण त्याच बरोबर ओठ पण कोरडे पडतात. त्यामुळे आता हिवाळ्यात नाही तर उन्हाळयात,पावसाळ्यात सगळ्याच ऋतूमध्ये ओठ कोरडे पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता लिप बामचा आवर्जून वापर केला जातो. बाजरात विविध प्रकारचे आणि ब्रँडचे लिप बाम मिळतात. लिपस्टिक रिमूव्ह केल्यांनतर लिप बाम लावल्यास ओठ चांगले राहतात आणि ओठ काळे पडत नाहीत. पण कधी घरच्या घरी लिप बाम तयार केला आहे का? गुलबाच्या पाकळ्यापासून लिप बाम तयार करायला खूप सोप्प आहे. चला तर मग जाणून घेऊयात कस बनवायच घरच्या घरी गुलाबाच्या पाकळ्यांपासून लिप बाम.

सगळ्यात आधी गुलाबाचे पाकळ्या स्वच्छ धुऊन घ्या. एक भांडे गॅसवर ठेवून त्यामध्ये गुलाबाचे पाकळ्या टाका. थोडे पाणी टाकून गुलाबाचे पाकळ्या छान उकळून घ्या. लिप बामचा रंग जर जास्त भडक हवा असेल तर त्यामध्ये बीटरूट किसून टाकू शकता. पाणी उकळून झाल्यांनतर गाळून एका बाउलमध्ये काढून घ्या. त्यामध्ये थोडे खोबरेल तेल आणि व्हॅसलिन, १ चमचा मध टाका. व्हॅसलिन आणि खोबरेल तेल टाकण्यापूर्वी वितळून घ्या. सर्व मिश्रण एकत्र करून काचेच्या डबीत फ्रिजमध्ये ८ ते १० तास चांगले सेट करण्यासाठी ठेवून द्या. त्यांनतर तुम्ही हा लिप बाम दररोज वापरू शकता.

हे ही वाचा:

खास मित्रांसह विराटने साजरा केला अनुष्काचा वाढदिवस

घरच्या घरी बनवा ”पोहा” पापड

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss