VARSHA GAIKWAD यांना लोकसभेवर पाठवणार; उद्धव ठाकरेंची घोषणा

"वर्षाताई मुंबई कॉंग्रेसची अध्यक्ष आहे त्यामुळे ती कुठे ही लढू शकते आणि जिंकू शकते"

VARSHA GAIKWAD यांना लोकसभेवर पाठवणार; उद्धव ठाकरेंची घोषणा

VARSHA GAIKWAD यांना लोकसभेवर पाठवणार; उद्धव ठाकरेंची घोषणा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेस कडून वर्षा गायकवाड यांचे नाव जाहीर झाले. नाव जाहीर होताच वर्षा गायकवाड आणि ईशान्य मुंबई लोकसभा (Loksabha Election) ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील(Sanjay Dina Patil ) यांनी आज (Matoshree) मातोश्री वर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. (Varsha Gaikwad meet Uddhav Thackeray)

दरम्यान उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत देशामध्ये पुन्हा हुकुमशाही येता कामा नये. घटना बदलता कामा नये. घटनेचं रक्षण करता आलं पाहिजे, यासाठी महाविकास आघाडी आणि देशाच्या पातळीवर इंडिया आघाडी एकत्रितपणे लढतील असे सांगितले.उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळाल्यानंतर शुभेच्छा देत म्हणाले की, “वर्षाताई मुंबई कॉंग्रेसची अध्यक्ष आहे त्यामुळे ती कुठे ही लढू शकते आणि जिंकू शकते”.वर्षा गायकवाड यांना लोकसभेवर पाठवणार,असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

पुढे ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या ज्या जागा आहेत, त्या निवडून आणण्यासाठी आम्ही पर्यंत करु. मतदाना दरम्यान हातात मशाल घेऊन तुतारी फुंकणार”.असे ही ते म्हणाले, महायुतीसंदर्भात प्रश्न विचारला असता,”महायुतीबरोबर आम्ही अजून काही आघाडी केलेली नाही आहे”. असे म्हणत मिश्कील टिपण्णी देखील केली आहे. “मी परवा सांगलीला जात आहे. सांगलीची जागा चांगली आहे,त्यामुळे ती जागा आम्ही जिंकणार”. असा विश्वास उद्धव ठाकरेंनी दर्शवला तर काल पर्यंत ज्यांच्यावर आरोप केले जात होते, त्यांना आज क्लीन चीट मिळत आहे.त्यामुळे हे घोटाळे झाले होते की नव्हते याचं उत्तर जनता त्यांना विचारत आहे.नाना पटोले खुप चांगले बोलले आहेत की, चावीचं खेळणं असतं. रोज सकाळी चावी दिली की, खेळणं सुरुच राहतं. असे म्हणत विरोधकांवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा:

बहिणीच्या जागी उभे राहिलात आणि त्यांना दुसरीकडे पाठवता, Naresh Mhaske यांचा Pankaja Munde यांना टोला

Sangali जिल्हा Congress ला द्रष्ट लावणाऱ्यांची द्रष्ट उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही: Nana Patole

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version