Tuesday, May 7, 2024

Latest Posts

Sangali मध्ये BJP ला मोठा धक्का, चार नगरसेवकांनी दिला Vishal Patil यांना पाठिंबा

सांगली लोकसभा मतदारसंघातून (Sangali Loksabha Constituency) मोठी बातमी येत असून भाजपच्या (BJP) चार नगरसेवकांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसचे (Congress) बंडखोर नेते विशाल पाटील (Vishal Patil) यांना पाठिंबा दर्शवला आहे. भाजपच्या या नगरसेवकांनी विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा देत उघडउघड त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाजप नगरसेवकांनी सांगलीमध्ये हा निर्णय घेतल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

विशाल पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करत सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला होता. महाविकास आघाडीकडून (Mahaviks Aghadi) सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा उमेदवार न देता शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षाच्या चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे नाराज विशाल पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. आता, भाजपच्या चार नगरसेवकांनीही भाजपमधून बंडखोरी करत विशाल पाटील यांना पाठिंबा दर्शवला आहे. भाजपच्या संदीप आवटे, निरंजन आवटी, शिवाजी दुर्वे आणि आनंदा माने यांनी आपल्या भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देत हे मोठे पाऊल उचलले आहे. याशिवाय भाजपचे आणखी तीन नगरसेवक छुपा पाठिंबा देत असल्याची माहिती मिळत आहे.

सांगलीचे भाजप उमेदवार आणि विद्यमान खासदार संजय काका पाटील (Sanjay Kaka Patil) यांच्यावर सांगली भाजपचे अनेक पदाधिकारी नाराज असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. याआधीही भाजपच्या दोन माजी आमदारांनी आपल्या पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा देत विशाल पाटील यांना पाठिंबा दर्शवला होता. भाजपचे माजी आमदार अजित घोरपडे आणि विलासराव जगताप यांनी आपला राजीनामा दिला होता.

हे ही वाचा:

BJP ला हद्दपार करणे हे लक्ष्य, आघाडी म्हणून साथ दिली पाहिजे, Balasaheb Thorat यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Sangali जिल्हा Congress ला द्रष्ट लावणाऱ्यांची द्रष्ट उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही: Nana Patole

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss