Monday, May 6, 2024

Latest Posts

Naresh Mhaske Exclusive: बहिणीच्या जागी उभे राहिलात आणि त्यांना दुसरीकडे पाठवता, Pankaja Munde यांना टोला

टाइम महाराष्ट्राचे संपादक राजेश कोचरेकर यांनी शिवसेना नेते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांची एक्सक्लूजीव मुलाखत घेतली. यावेळी बोलताना नरेश म्हस्के यांनी भाजप नेत्या आणि महायुतीच्या बीड लोकसभा मतदारसंघातील खासदार पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली.

लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election 2024) दुसरा टप्पा देशभरात पार पडत आहे तरी अद्याप महायुतीचा (Mahayuti) जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. याच पार्श्वभूमीवर टाइम महाराष्ट्राचे (Time Maharashtra) संपादक राजेश कोचरेकर (Rajesh Kocharekar) यांनी शिवसेना (Shivsena) नेते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांची एक्सक्लूजीव मुलाखत घेतली. यावेळी बोलताना नरेश म्हस्के यांनी भाजप नेत्या आणि महायुतीच्या बीड लोकसभा मतदारसंघातील (Beed Loksabha Constituency) खासदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर टीका केली. “बहिणीच्या जागी आपण उभे राहिलात आणि त्यांना दुसऱ्याच्या जागी पाठवत आहात, हे योग्य नाही,” असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

पंकजा मुंडे यांनी बीडमधील सभेत आपण प्रीतम मुंडे (Preetam Munde) यांच्या जागेवर लढत असून प्रीतम मुंडे या नाशिकच्या जागेवरून लढतील असे वक्तव्य केले होते. टाइम महाराष्ट्रला दिलेल्या एक्सक्लूजीव मुलाखतीत याबाबत प्रश्न विचारला गेला असता नरेश म्हस्के म्हणाले, “पंकजा मुंडे यांनी नाशिकच्या जागेबाबत केलेल्या व्यक्तव्यावर छगन भुजबळ यांनी उत्तर दिले आहे. नाशिकची जागा शिवसेनेची आहे. याठिकाणी शिवसेनेचा खासदार आहे. अश्या पद्धतीचे वक्तव्य योग्य नाही. आपल्या नेत्यांनी त्यासंदर्भात वेळ घ्यायला हवा. बहिणीच्या जागी आपण उभे राहिलात आणि त्यांना दुसऱ्याच्या जागी पाठवत आहात, हे योग्य नाही. तूर्तास, भाजपचे नेते यासंदर्भात निर्णय घेतील,”

प्रीतम मुंडे यांचे लोकसभा तिकीट भाजपकडून काढण्यात आले आणि ते पंकजा मुंडे यांना देण्यात आले. याविषयी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “मला याविषयी काही बोलायचे नाही. प्रीतम मुंडेंच्या जागी स्वतः पंकजा मुंडे उभ्या राहिल्या आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या संदर्भात वक्तव्य करावं पण ज्या जागेवर शिवसेनेचा खासदार दोनवेळा निवडून आला आहे त्याविषयी बोलणं योग्य नाही. यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण होतो. आणि महायुतीच्या कामामध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे पंकजाताईंना माझी हात जोडून विनंती आहे. आपल्या पक्षातील मुख्य नेते यासंदर्भात निर्णय घेतील. आपण अश्यासंदर्भात वक्तव्य करायला नको.”

हे ही वाचा:

Amravati मध्ये Bachchu Kadu यांच्या सभेची परवानगी नाकारून Amit Shah यांची होणार सभा, प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

BJP ने चावी दिली तेवढेच बोलणाऱ्या Eknath Shinde यांनी Congress वर बोलू नये, Nana Patole यांचा घणाघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss