१ फेब्रुवारी २०२४ च्या अर्थसंकल्पात नेमक्या कोणत्या घोषणा होणार, निर्मला सीतारामन यांनी दिले संकेत

१ फेब्रुवारी २०२४ रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

१ फेब्रुवारी २०२४ च्या अर्थसंकल्पात नेमक्या कोणत्या घोषणा होणार, निर्मला सीतारामन यांनी दिले संकेत

१ फेब्रुवारी २०२४ रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. मात्र या अर्थ संकल्पात कोण कोणत्या गोष्टी जाहीर केल्या जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यावेळी लोकसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे निकालाआधी अर्थमंत्री निर्मला सीतारामन काय घोषणा करणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

काही दिवसांपूर्वी अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्या आपल्या भाषणात म्हणाल्या, २०१४ नंतर मोदी सरकारने ‘अर्जन्सी’ आणि ‘मिशन मोड’ मध्ये योजना राबवल्या आहेत. विकसित भारताचा पाया कसा घातला. अर्थसंकल्पात सरकारचे लक्ष कोठे असणार याबाबत संकेत दिले होते. सरकार जात किंवा धर्माच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव करत नाही. त्यामुळे प्रत्येकाला त्याचा लाभ मिळावा, अशा पद्धतीने सरकारी योजना बनवण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची फक्त चार गटांमध्ये विभागणी केली आहे. ते म्हणजे तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब. सरकारच्या धोरणांच्या केंद्रस्थानी हे ४ गट ठेवण्याचे संकेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहेत.

यंदाच्या अर्थसंकल्पमध्ये युवक, महिला, शेतकरी जे सर्व जनतेला अन्नपुरवठा करतात, गरीब ज्यांना अजूनही कोणत्याच सरकारी योजनेची मदत मिळाली नाही, यांच्यासाठी अर्थसंकल्पामध्ये कोणत्या घोषणा होणार का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. आमची सर्व धोरणे त्यांचे जीवन सुधारण्यासाठी तयार करण्यात आली आहेत, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. जेव्हा त्यांना मध्यभागी ठेवले जाते, तेव्हा आपल्याला इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. तो कोणत्या समाजाचा आहे किंवा कोणत्या धर्माचा आहे हे पाहणे गरजेचे नाही. आर्थिक दृष्टिकोनातून सरकार कोणत्या घटकांवर लक्ष केंद्रित करणार आहोत, असे निर्मला सीतारामन म्हणल्या. कौशल्य विकास, उत्तम कृषी तंत्रज्ञान आणि देशातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यावर आमचा भर असेल, असे देखील सीतारामन म्हणल्या.

हे ही वाचा:

‘निव्वळ निवडणुकांसाठीचे हे गाजर’…आरक्षण मिळाल्यानंतर किरण मानेंनी केलेली पोस्ट लक्षवेधी

भंडाऱ्यातील आयुध निर्माणी कंपनीत भीषण स्फोट, स्फोटात एकाचा मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version