Tuesday, April 23, 2024

Latest Posts

भंडाऱ्यातील आयुध निर्माणी कंपनीत भीषण स्फोट, स्फोटात एकाचा मृत्यू

मागील काही दिवसांपासून राज्यभरात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यभरात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. भंडारा शहरातील जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कंपनीत (Ordnance Factory) भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडला. सीएक्स विभागात हा स्फोट(Bhandara Ordnance Factory Blast) झाला आहे. लागलेल्या या भीषण स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अविनाश भागवत मेश्राम असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अविनाश मेश्राम हे सकाळीच्या शिफ्टला कामासाठी गेले होते. त्यांची शिफ्ट पहाटे ६ वाजता सुरु झाली.

सीएक्स विभागात बारुदचे कोट तयार करण्यात येत होते. त्यावेळी तिथे हा स्फोट हा घडला आहे. हा स्फोट झाला तेव्हा तिथे अविनाश मेश्राम हे एकटेच होते. त्यामुळे त्यांचा या स्फोटात मृत्यू झाला आहे. घडलेल्या या भीषण स्फोटामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. भंडारा शहरात जवाहरनगरमध्ये असलेल्या आयुध निर्माणी कंपनीत (ऑर्डिनेंस फॅक्टरी) हा भीषण स्फोट घडला आहे. या स्फोटाच्या आवाजामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भंडाऱ्यात घडलेल्या या भीषण स्फोटाचा तपास पोलीस करत आहेत. याआधी सुद्धा २ जानेवारीला भंडारा शहरात भीषण स्फोट घडला होता. सनफ्लॅग कंपनीत हा स्फोट घडला होता. या स्फोटात ८ नागरिक जखमी झाले होते. भंडाऱ्यात स्फोट होण्याची ही दुसरी घटना आहे.

भंडाऱ्यातील (Bhandara) सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीला २ जानेवारीला पहाटेच्या सुमारास हा भीषण स्फोट घडला होता. या स्फोटात तीन कामगार जखमी झाले आहेत. तसेच कंपनीत काम करणारे इतर आठ कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या कंपनीमध्ये झालेला स्फोट एवढा भीषण होता कि आजूबाजूच्या परिसरात देखील हादरे बसले आहेत. त्यानंतर आज पुन्हा एकदा भंडाऱ्यातील एका कंपनीचा स्फोट झाला आहे.

हे ही वाचा:

‘मराठा लढतो तेव्हा इतिहास घडतोच’…आरक्षण मिळाल्यानंतर प्राजक्ता गायकवाडची खास पोस्ट

आपण आजवर ५० टक्क्यांच्या समुद्रात पोहत आहोत – मंत्री छगन भुजबळ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss