Saturday, May 18, 2024

Latest Posts

‘निव्वळ निवडणुकांसाठीचे हे गाजर’…आरक्षण मिळाल्यानंतर किरण मानेंनी केलेली पोस्ट लक्षवेधी

मराठा आरक्षणासंदर्भातील मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्याबाबतचा अध्यादेशही काढण्यात आला आहे.

मराठा आरक्षणाचा आज ऐतिहासिक विजय झाला आहे,कित्येक महिन्यांपासून सुरु असलेला लढा अखेर संपला आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्याबाबतचा अध्यादेशही काढण्यात आला आहे.

दरम्यान किरण माने विविध सामाजिक, राजकीय विषयांवर पोस्ट करत असतात.ते कधी वादग्रस्त वक्तव्यामुळे किंवा सामाजिक विषयांवर भाष्य करण्यामुळे चर्चेत येत असतात.गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला माने पाठिंबा देत आहेत. ते सोशल मीडियावर याविषयी विविध पोस्ट करत आहेत. अशातच त्यांनी आज केलाली पोस्ट ही मराठ्यांना सावध करणारी आहे.

किरण मानेंनी सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहीलंय की, “मराठा बांधवांनो, तहात हारू नका.”…सदर अध्यादेश १६ फेब्रूवारी २०२४ पासून किंवा त्यानंतर लागू होईल.” आणि “…यामुळे बाधित व्यक्ती दरम्यानच्या काळात आपल्या हरकती, सूचना संबंधितांकडे नोंदवू शकतील, ज्या विचारत घेण्यात येतील.” हा तिढा लै लै लै महत्त्वाचा आहे.निव्वळ निवडणुकांसाठीचे हे गाजर आहे. जागे रहा.एक मराठा लाख मराठा”अशी पोस्ट करत त्यानीं मराठ्यांना सावध केलं आहे.सध्या ही पोस्ट त्यांची सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

या मराठा आरक्षण मिळाल्यानंतर या आरक्षणाविषयी भुजबळ म्हणाले, “मराठा समाजाचा विजय झाला असं वाटतंय पण मला तसं काही पूर्ण पणे वाटत नाही. अशा प्रकारे झुंडशाहीने नियम, कायदे बदलता येत नाहीत. आम्ही शपथ घेताना कोणालाही न घाबरता काम करु अशी शपथ घेतो. पण, आता जे झालं आहे ती एक सूचना आहे. याचे रुपांतर नंतर होईल”

भुजबळ पुढे म्हणाले, “सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशावर १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे आणि इतर समाजातील वकील असतील त्यांनी याचा अभ्यास करुन यावर हरकती लाखोंच्या संख्येने पाठवाव्यात. जेणेकरुन सरकारला लक्षात येईल ही याबाबत दुसरीही बाजू आहे.”त्यामुळे आता १६ फेब्रुवारीची प्रतिक्षा संपुर्ण मराठा समाजाला आहे.

हे ही वाचा:

एनपीएस खातेदारांना १ फेब्रुवारी २०२४ पासून नवे नियम लागू होणार, पैसे काढण्यावर निर्बंध

भंडाऱ्यातील आयुध निर्माणी कंपनीत भीषण स्फोट, स्फोटात एकाचा मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss