Tuesday, May 21, 2024

Latest Posts

“अखेर ती मला भेटली” म्हणत अभिनेत्री नेहा शितोळेने शेअर केली पोस्ट

सध्या नेहा ची एक पोस्ट खूप चर्चेत आहे. नेहाच्या एका चाहतीने तिच्यासाठी एक कलाकृती बनवली आहे.

मुंबई: नेहा शितोळे हे नाव ऐकताच आपसूक बिग बॉस मराठीचा दुसरा सिजन डोळ्यसमोर येतो. नेहा कायमचं चाहत्यांचे मनोरंजन  करत असते. मग ती वेबसिरीज असो वा एखादी सोशल मीडियावरील पोस्ट. सध्या नेहा ची एक पोस्ट खूप चर्चेत आहे. नेहाच्या एका चाहतीने प्रचंड मेहनत तिच्यासाठी घेऊन एक कलाकृती बनवली आहे. नेहाने याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
या व्हिडिओत नेहाचे सुंदर चित्र काढलेली फ्रेम बघायला मिळत आहे. या फोटोला नेहाने “अखेर ती मला भेटली” असं म्हटलं. गेलं दीड वर्ष आमची चुकामूक होत होती.. आज शेवटी भेटायचा योग आला… आज आषाढी एकादशीच्या दिवशी माझ्या ह्या नव्या मैत्रिणीच्या रूपाने रखुमाईचं भेटली जणू… माझी माझ्या स्वतः शी पुन्हा ओळख करून देण्यासाठी… एका नवीन रुपात लवकरच तुमच्या समोर येणार आहे… तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या. असं म्हटलं आहे.
नेहा व तिच्या चाहतीची भेट खूप दिवसांपासून लांबवणीवर पडत असल्याचे नेहाने सांगितले. मात्र अखेरीस दोघींनी आषाढी एकादशीचे निम्मित साधले आणि त्या दोघींची भेट झाली. या भेटीत नेहाच्या चाहतीकडून तिला एक खास गिफ्ट मिळालं आहे. हे चित्र अक्षय सावंत यांनी काढले आहे. नेहा शितोळेची सेक्रेड गेम्स मधील भूमिका देखील विशेष गाजली. या वेबसिरीजला चार वर्ष पूर्ण झाली असून तिने यासंबंधी एक रील शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने वेबसिरीजमध्ये काम केलेल्या कलाकारांचे फोटोज व्हिडीओ स्वरूपात आहे.

Latest Posts

Don't Miss