Tuesday, May 21, 2024

Latest Posts

‘वो तेरे प्यार का गम’ अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

दरवेळी अमृता फडणवीस यांच्या नवीन गाण्याची चाहते आतुरतेनं वाट पाहत असतात. त्यांनी यापूर्वी अनेक अल्बमसाठी गायन केलं आहे.

मुंबई :  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. दरवेळी अमृता फडणवीस यांच्या नवीन गाण्याची चाहते आतुरतेनं वाट पाहत असतात. त्यांनी यापूर्वी अनेक अल्बमसाठी गायन केलं आहे. अमृता फडणवीस यांनी याआधीही वेगवेगळ्या धाटणीची गाणी गायली आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्या गायिका म्हणून पुढं आल्या होत्या. नुकतच अमृता फडणवीस यांच सारेगम निर्मित वो तेरे प्यार का गम हे गाणं प्रदर्शित झालं आहे.
हेही वाचा.
आजवर अमृता यांची अनेक गाणी प्रदर्शित झालेली आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या गाण्यांनी महाराष्ट्राला वेड लावलंय. आता  नुकत्याच वो तेरे प्यार का गम प्रदर्शित झालेल्या रसिक प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बऱ्याच दिवसांपासून रसिक प्रेक्षक या गाण्याची वाट पाहत होते. या गाण्याबद्दल अमृता फडणवीस यांनी या आधी ट्विटरवर ही माहिती दिली होती. आतापर्यत या गाण्याला 15 लाखहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे व्हायरल होत आहे. गाण्यावर नेटकऱ्यानी कमेंट्सचा पाऊस पडला आहे. अमृता यांनी गायलेलं हे मुळ गाणं मुकेश यांनी गायलं आहे. आनंद बक्षी यांनी या गाण्याचे लेखन केले आहे.
या आधी अमृता यांनी गायलेल्या योहानीच्या माणिके मागे हिथे या गाण्याला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्याचबरोबर यापूर्वी नवरात्र, गणेशोत्सवाच्या निमित्ताने ही त्यांनी गायलेल्या गाण्यांचे चाहत्यांनी खूप कौतूक केले आहे.
अमृता फडणवीस या सोशल मीडियावर अनेकदा राजकीय पोस्ट, टीका या गोष्टींमुळे ही चर्चेत असतात.

Latest Posts

Don't Miss