”या” कारणांमुळे अमृता शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो

”या” कारणांमुळे अमृता शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे  फोटो

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) नृत्य आणि अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. अमृताने मराठी चित्रपटांबरोबर हिंदी चित्रपटात पण काम केले आहे. ”अदा” या मालिकेतून चित्रपटसृष्टीमध्ये काम करायला सुरुवात केली. ‘कॉमेडी एक्सप्रेस’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पण केले होते. त्यांनतर तिने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. अमृता खानविलकरने हिंदी दूरदर्शनवर काम करणाऱ्या अभिनेता हिमांशू मल्होत्रासोबत (Himmanshoo Malhotra) २१ जानेवारी २०१५ रोजी लग्न केले. अमृता आणि हिमांशूची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. दोघांना एकत्र काम करताना पाह्यण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अमृता जास्त तिच्या नवऱ्यासोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत नाही. त्यामुळे तिला चाहते नेहमी प्रश्न विचारत असतात. हिमांशुसोबत फोटो का शेअर करत नाही याच कारण तिने सांगितले आहे.

एका मुलाखती दरम्यान अमृताने या प्रश्नांची उत्तर दिली आहेत. ‘आमचे चाहते हे आमच्या कुटुंबाचा एक भाग आहेत असे मला वाटते, काही लोकांना तुम्ही आवडता तर काही लोकांना नाही. जो पर्यंत ते तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाही तो पर्यंत सर्व काही ठीक आहे. माझ्या कामाबद्दल किंवा इन्स्टाग्रामवर काही शेअर केल्याबद्दल त्याविषयी जर बोलत असाल ठीक वाटत पण जर मला आणि माझ्या हिमांशूबद्दल किंवा कुटुंबाबद्दल बोलाल तर ते मला नाही आवडणार म्हणून मी त्याच्याबद्दल पोस्ट शेअर करत नाही कारण मला त्याला या सगळ्यागोष्टीपासून दूर ठेवायचे आहे. मला हिमांशूचा बचाव करणे महत्वाचे वाटते. ट्रोलिंग झाल्यावर त्याला खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे गोष्टींची मी नेहमी काळजी घेईन आणि घेत राहीन”. असे अमृताने सांगितले आहे.

मी जुन्या विचारांची आहे. मी आणि हिमांशु तेव्हापासून ओळखतो जेव्हा इन्स्टाग्राम किंवा कोणतेही सोशल मीडिया नव्हते. २००४ पासून मी आणि हिमांशु एकमेकांना ओळखतो. आम्ही एकत्र भेटलो की कॅमेरामध्ये फोटो काढायचो. आम्हाला दोघांनाही सुरक्षित ठेवायचे आहे आणि एकमेकांची ओळख जपायची आहे. असे देखील अमृताने सांगितले आहे.

 

हे ही वाचा:

घरच्या घरी बनवा लिप बाम आता विकत घ्याची गरज नाही

खास मित्रांसह विराटने साजरा केला अनुष्काचा वाढदिवस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version