Saturday, May 18, 2024

Latest Posts

खास मित्रांसह विराटने साजरा केला अनुष्काचा वाढदिवस

विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) लोकप्रिय जोडप्यानपैकी एक आहे. २०१७ मध्ये विराट आणि अनुष्काने लग्न केले. आणि २०२१ मध्ये पहिल्या बाळाला जन्म दिला आणि यावर्षी पुन्हा अनुष्का आणि विराटने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. पहिल्या मुलीचे नाव वामिका असून दुसऱ्या मुलाचे नाव आकाय असे ठेवले आहे.

अनुष्काने १ मे रोजी ३७ वा वाढदिवस साजरा केला. अनुष्काने वाढदिवसाचे  सोशल मिडियावर फोटो शेअर करत ती त्यामध्ये एन्जॉय  करताना दिसत आहे. विराटने तिच्या वाढदिवसाचे आयोजन केले होते. यावर्षी अनुष्काने वाढदिवस  भारतातच साजरा केला. यावर्षी साधा लूक केला होता. अनुष्काच्या वाढदिवसानिमित्त विराट कोहलीच्या एका फॅन पेज ने हे फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये खेळाडूंनी पण हजेरी लावली होती. फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis)आणि ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) या फोटोमध्ये दिसत आहेत.

विराट आणि अनुष्काने दोन्ही मुलांची नावे खूप विचार करून ठेवली आहेत. पहिल्या मुलीची नाव ”वामिका” (Vamika) असून या नावाचा वामिकाचा अर्थ संस्कृतमध्ये ‘देवी दुर्गा’ असा आहे. हे नाव अनुष्का आणि विराटचे नाव एकत्र करून ठेवले आहे. आणि दुसऱ्या मुलाचे नाव ”आकाय” (Akay) ठेवले आहे. आकाय चा अर्थ ‘चंद्र’ असा होतो. निराकार आणि कोणताही आकार नसलेला रूप असा अर्थ आकाय या नावाचा होतो.

अनुष्का सध्या जाहिरातीमधून दिसून येते. वामिकाच्या जन्म नंतर अनुष्का चित्रपटसुष्टीपासून जरा दूर झाली आणि खाजगी आयुष्यामध्ये जास्त लक्ष देत आहे. तरी सुद्धा अनुष्का सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. अनुष्काने २००८ मध्ये ”रब ने बना दि जोडी” या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले.

हे ही वाचा:

घरच्या घरी बनवा ”पोहा” पापड

हॅरी पॉटर मधील ‘हे’ कलाकार दिसणार हिंदी वेब सिरीज मध्ये.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss