Saturday, May 18, 2024

Latest Posts

मुकेश अंबानी यांच्या सुनेच्या अरंगेत्रमसाठी कलाकारांनी लावली हजेरी

या सोहळ्याला बॉलिवूड अभिनेता सलमान खान, आमिर खान, रणवीर सिंग तसेच महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) व नीता अंबानी (Neeta Ambani) यांनी ५ जून २०२२ रोजी राधिका मर्चंट (Radhika Merchant) या आपल्या होणाऱ्या सुनेचा अरंगेत्रम कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला सिनेसृष्टीतील तसेच राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. हा सोहळा जियो वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याच्याशी राधिका मर्चंटचा साखरपुडा २०१९ मध्ये झाला होता. त्यानंतर ते अनेकदा एकत्र दिसले.

या सोहळ्याला बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan), आमिर खान (Aamir Khan), रणवीर सिंग (Ranveer Singh) तसेच राजकुमार हिरानी,मीजान जाफरी,जहीर खान ,सागरिका घाटगे
महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. राधिका चा परफॉर्मन्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी तिच्यातील या कलेचे भरभरून कौतुक केले आहे

Arangetram Performance video Shared by Viral Bhayani

अरंगगेत्रम म्हणजे नेमकं काय ?
अरंगगेत्रम म्हणजे काय हे माहित नसेल तर, या सोहळ्यात क्लासिकल डान्सर पहिल्यांदाच मोठ्या व्यासपीठावर नृत्य सादर करतात. हा सोहळा बघण्यासारखा असतो. अरंगगेत्रम हा एक तामिळ शब्द आहे, याचा अर्थ एक क्लासिकल डान्सर आपलं फॉर्मल ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर स्टेजवर सर्वांससमोर परफॉर्म करतो. या सोहळ्यात राधिका मर्चंटच्या नृत्याने सगळेच भारावून गेले. राधिकाच्या नृत्याने सगळ्यांचे मन जिंकले. तिच्या परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

कोण आहे राधिका मर्चंट ?
इंडस्ट्रिअलिस्ट वीरेन आणि शैला मर्चंट यांची राधिका मर्चंट मुलगी आहे, ती एक क्लासिकल डान्सर देखील आहे. ती अनेक वर्षांपासून ही नृत्यकला शिकत आहे. आता जेव्हा तिचं यातलं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा तिच्यासाठी जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये अरंगेत्रम (Arangetram) सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तिचा परफॉर्मन्स व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Latest Posts

Don't Miss