Tuesday, May 21, 2024

Latest Posts

Aryan Khan करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट

बॉलीवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) नेहमीच कोणत्या तरी कारणामुळे चर्चेत असतो. आर्यन खानची ‘स्टारडम’ ही वेबसीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरिजचे दिग्दर्शन आर्यन खानने केले आहे. आर्यन खान त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे पण चर्चेत असतो. बॉलीवूड अभिनेत्री शनाया कपूर (Shanaya Kapoor), अनन्या पांडे (Ananya Panday) यांच्यासोबत आर्यन खानचे नाव जोडलेलं होते. आर्यन खान आता परदेशी अभिनेत्री आणि मॉडेल लारिसा बोन्सीला (Larissa Bonesi) ला डेट करत आहे,  अशी चर्चा सुरु झाली आहे. चाहते नेहमीच त्याला पाहण्यासाठी उत्सुक असतात.

लारिसा बोन्सी ही ब्राझीलमधील मॉडेल आणि डान्सर आहे. ‘गो गोवा गॉन’ आणि बॉलीवूडचा अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्यासोबत ‘देसी बॉयज’ मध्ये तिने काम केले होते . जॉन अब्राहम आणि अक्षय कुमारसोबत ‘सुबह होने न दे’ या ब्लॉकबस्टर गाण्यामध्ये तिने काम केलं होतं . स्टेबिन बेनच्या  म्युझिक व्हिडीओमध्ये तिने काम केले आहे. गुरू रंधावाच्या ‘सूरमा सूरमा’ म्युझिक व्हिडीओमध्ये, तिने विशाल मिश्रासोबत पण काम केले आहे. टायगर श्रॉफ आणि सूरज पंचोली यांच्या म्युझिक व्हिडीओ अल्बममध्ये ती दिसून आली होती. बॉलीवूडबरोबर तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पण काम केले आहे. टॉलिवूडच्या ‘नेक्स्ट एनी’ आणि ‘थिक्का’ चित्रपटामध्ये काम केले आहे. लारिसाच्या संपूर्ण कुटुंबियांना आर्यन खान फॉलो करत आहे. लारिसाच्या आईला वाढदिवसानिमित्त आर्यनने खास भेटवस्तू पण दिली होती.

‘स्टारडम’ या वेबसीरिज दिग्दर्शनाचे काम सांभाळत आहे. आर्यन खानची हे पहिलीच वेबसीरिज असणार आहे. त्यामुळे चाहते खूप उत्सुक आहेत. या वेबसीरिजच्या माध्यमातून आर्यन खान लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

हे ही वाचा:

ओल्या काजूची भाजी कशी करायची?

‘हा’ अभिनेता शंकराचा मोठा भक्त, छातीवर आहे शंकराचा टॅटू

 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss