Tuesday, April 23, 2024

Latest Posts

‘हा’ अभिनेता शंकराचा मोठा भक्त, छातीवर आहे शंकराचा टॅटू

कलाकार नेहमीच त्यांच्या अभिनयामुळे आणि चित्रपटांमुळे चर्चेत असतात. अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्याने चित्रपटामध्ये शिवभक्ताचे काम केले आहे. यासोबतच, तो त्याच्या खऱ्या आयुष्यात पण कट्टर शिवभक्त आहे. मराठी चित्रपटसृष्टीबरोबर आता हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पण अनेक शिवभक्त असल्याचे समजते आहे. या अभिनेत्याच्या सोबत नेहमी रुद्राक्ष असते. तसेच, त्याने त्याच्या छातीवर शंकराचा टॅटू पण काढला आहे. असा हा अभिनेता कोण बरं?

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) हा मोठा शिवभक्त आहे. त्याचबरोबर त्याने घराचे नाव पण शंकर भगवानशी यांच्याशी संबंधित असलेलं ठेवले आहे. अजय देवगणने अनेक चित्रपट शंकरावर केले आहेत. त्याने घराचे  नाव ‘शिवशक्ति’ असे ठेवले आहे. मुंबई जुहू येथे अजय आणि काजलचा बंगला आहे. अजय देवगणच्या बंगल्याची किंमत ६० कोटी इतकी आहे. अजय देवगणचा सध्या रिलीज झालेला चित्रपट ‘शैतान’ (Shaitaan) बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. आता एप्रिल महिन्यामध्ये ‘मैदान’ (Maidan) हा चित्रपट १० एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट क्रीडाशी संबंधित आहे. या चित्रपमध्ये अजय देवगण फुटबॉल प्रशिक्षकाच्या भमिकेमध्ये असणार आहे. बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) चा ‘सिंघम अगेन’ (Singham Again) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण असणार आहे.

अजय देवगण ने १०० पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहेत. अभिनयाबरोबर त्याने चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती पण केली आहे. अजय देवगणचा पहिला चित्रपट ‘फूल और काटे’ हा होता. या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये त्याने पदार्पण केले. त्याचे दिलवाले, जिगर, दिल जले, सुहाग, गोलमाल, सिंघम, सन ऑफ सरदार, तान्हाजी असे अनेक चित्रपट सुपरहिट झाले आहेत. त्याचबरोबर त्याने ‘यू मी और हम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अजय देवगणचे खरे नाव विशाल देवगण आहे. अजय देवगण याचे बॉलीवूडमधील करिश्मा कपूर, रवीना टंडन आणि तब्बू या अभिनेत्रींसोबत नाव चर्चेत होते. अजय देवगण ने १९९९ मध्ये काजल सोबत लग्न केले.

हे ही वाचा:

भाजप खासदार Unmesh Patil करणार शिवसेनेत प्रवेश? Sanjay Raut यांची निवासस्थानी घेतली भेट

VANCHIT चर्चा करत नाही म्हणून आम्ही निवडणुका लढायच्या नाहीत का? SANJAY RAUT यांचा सवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss