Sunday, May 19, 2024

Latest Posts

उर्फीच्या ट्विटवर चित्रा वाघ पुन्हा संतापल्या, पवारसाहेब, सुप्रिया सुळेंना हा नंगानाच चालणार नाही

अभिनेत्री उर्फी जावेदने (Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यातील वाद काही केल्या थांबाच नाव घेत नाही आहे.

अभिनेत्री उर्फी जावेदने (Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यातील वाद काही केल्या थांबाच नाव घेत नाही आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघींमध्ये सोशल मिडिया युद्ध हे सुरु आहे. उर्फी जावेद चित्र वाघ यांच्या प्रत्येक टीकेला उत्तर देताना दिसते. तसेच उर्फी नेहमीच काहीतरी ट्विट करत चित्रा वाघ यांना डिवचत असते. आता देखील उर्फीने तिच्या एक नवीन ट्विटद्वारे चित्रा वाघ यांना डिवचले आहे. उर्फीने “मेरी DP इतनी ढासू, चित्रा मेरी सासू”, अशा आशयाचे एक ट्विट करत चित्रा वाघ यांची खिल्ली उडवल्याने चर्चांना उधाण आले आहे. याआधी सुद्धा उर्फीने “आपण लवकरच मैत्रिणी होऊ चित्रूsss”असं म्हणत चित्रा वाघ यांना डिवचलं होतं. तसेच “जर तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची संपत्ती जाहीर केली तर मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे” असं जाहीर आव्हान देखील चित्रा वाघ यांना दिल होत. यावर चित्रा वाघ या देखील चांगल्याच संतापल्या आहेत आणि त्यांनी देखील उर्फीला प्रतिऊत्तर हे दिल आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचं दर्शन घेत पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी बोलताना चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला. तसेच, यांच्याकडे जे पद आहे, ते पद आम्ही यापूर्वीच भोगलं आहे, असे म्हणत चाकणकर यांच्यावर निशाणा साधला. त्या पुढे म्हणाल्या, मी २० वर्षे राष्ट्रवादीत काम केलं आहे. त्यामुळे मी स्वतः अतिशय जबाबदारीने सांगू शकते की, पवारसाहेब किंवा सुप्रिया ताई यांनाही हा नंगानाच आवडणार नाही असं चित्र वाघ या म्हणाल्या आहेत. पुढे चित्रा वाघ म्हणाल्या, उर्फी जावेदच्या प्रकृतीला माझा अजिबात विरोध नाही आहे . शेवटी कोणी काय घालावं आणि कोणी काय घालू नये हे ठरवण्याचा आपल्याला अधिकार नाही. उर्फी रस्त्यावर विकृत कपड्यात फिरुन मुलांना उत्तेजित करत आहे. मी उर्फीच्या विरोधात नाही, तिच्या विकृतपणे वावरण्याला माझा आक्षेप आहे”.

तसेच चित्रा वाघ पुढे म्हणाल्या,”सावित्रीबाईंमुळे महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे. त्यांना तरी हा नंगा नाच पटेल का? प्रसिद्धीसाठी काहीही करण्याची गरज नाही. अश्या विकृतीचं समर्थन करणाऱ्यांना सद्बुद्धी देवो असं मी आजच भवानी मातेला साकडं घातलं आहे. तसेच विकृतीच्या विरोधात लढायला बळ दे, असं देखील मागणं चित्रा वाघ यांनी केली आहे. पुढे उर्फीवर निशाणा साधत त्या म्हणाल्या आहेत की, ज्या दिवशी मला ती सापडेल. तेव्हा पहिल्यांदा तिचं थोबाड रंगवेन आणि नंतर मी तुम्हाला ट्वीट करुन सांगेल की, मी काय केलं. हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही.’

हे ही वाचा:

मुख्यमंत्री एकाच कॅसेट लावत आहेत, खडसेंच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा

सुनील तटकरे यांची भाषणे विधीमंडळाच्या दस्ताऐवजातून इतिहासाचा भाग झालाय, अजित पवार

Flipkart वर बिग बँग सेल ऑफ द इयर होणार सुरु, फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशिन मिळणार अर्ध्या किंमतीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss