केदार शिंदेचा वादाचा पोवाडा

प्रसिद्ध चित्रपट, नाट्य दिग्दर्शक केदार शिंदें हे त्यांच्या वेगवेगळ्या कलाकृतींसाठी ओळखले जातात. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यांच्या चित्रपट, नाटकांनी मराठी मनांवर अधिराज्य केले आहे. सध्या त्यांच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

केदार शिंदेचा वादाचा पोवाडा

प्रसिद्ध चित्रपट, नाट्य दिग्दर्शक केदार शिंदें हे त्यांच्या वेगवेगळ्या कलाकृतींसाठी ओळखले जातात. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यांच्या चित्रपट, नाटकांनी मराठी मनांवर अधिराज्य केले आहे. सध्या त्यांच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यातच त्यांनी केलेलं ट्विट चर्चेचा विषय झाला आहे. ५ मे रोजी “द केरळ स्टोरी” नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आणि देशभरामध्ये एका वेगळ्याच वातावरण निर्मितीला सुरुवात झाली आहे. या चित्रपटामधून इसिस, हिंदू – मुस्लिम संघर्ष, लव जिहाद सारख्या मुद्द्यांकडे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी लक्ष वेधले आहे. विपुल अमृतलाल शहा यांनी या चित्रटाची निर्मिती केली आहे. तीन दिवसांत या चित्रपटानं देशभरातून पन्नास कोटींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट हिट होताना दिसतो आहे.

मात्र यासगळयात दिग्दर्शक केदार शिंदे यांनी यासंबंधी पोस्ट शेअर करून लक्ष वेधून घेताना दिसत आहे. केदार शिंदे त्यांनी ट्विट करत, द केरळ स्टोरीचा फटका आपल्या चित्रपटाला कसा बसला आहे. आणि यामध्ये राजकीय हस्तक्षेप कसा होतो आहे, यासंबधीची ट्विट होताना दिसत आहे. चित्रपट आणि राजकीय भूमिका याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले आहे. ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, दुर्दैव…महाराष्ट्रात “केरला स्टोरी” या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवतायत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने “महाराष्ट्र शाहीर” प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का? शिंदे यांच्या त्या ट्विटवर त्यांना संमिश्र प्रतिसाद मिळाल्या आहेत.

काहींनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे तर काहींनी त्यांना सुनावले देखील. तुम्ही केरळ स्टोरी आणि महाराष्ट्र शाहीर यांची तुलना करु नका. हे दोन्हो वेगळे विषयाचे आणि आशयाचे चित्रपट आहे. दोन्ही वेगवेगळ्या चित्रपट आहेत. लोकांना त्या विषयाचे गांभीर्य जास्त वाटत असल्यानं ते तो चित्रपट पाहण्यास प्राधान्य देत आहेत. कदाचित आणखी काही दिवसांनी तुमच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिंदे यांचा महाराष्ट्र शाहीर महाराष्ट्र दिनाच्या औचित्यानं प्रदर्शित झाला. त्याचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून त्यात अंकुश चौधरी, सना शिंदे, मृण्मयी देशपांडे, अतुल काळे, निर्मिती सावंत, अश्विनी महांगडे, अमित डोलावत यांच्या भूमिका साकारल्या आहेत.

हे ही वाचा : 

Majhi Tujhi Reshimgath मधील परीची आता हिंदी मालिकेत एन्ट्री 

‘Sanskritik Kaladarpan’ पुरस्कार सोहळा संपन्न, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना ‘सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version