Wednesday, May 15, 2024

Latest Posts

जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा, विकास करणाऱ्या उमेदवारांना मतदान करा – Imtiyaj Jaleel

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून एमआयएम चे उमेदवार आणि विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी मतदारांना आवाहन करत 'जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा आणि विकास करणाऱ्या उमेदवारांना मतदान करा,' असे आव्हान केले आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून (Aurangabad Loksabha Constituency) एमआयएमचे (AIMIM) उमेदवार आणि विद्यमान खासदार इम्तियाज जलील (Imtiyaj Jaleel) यांनी मतदारांना आवाहन करत ‘जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा आणि विकास करणाऱ्या उमेदवारांना मतदान करा,’ असे आव्हान केले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी, “देशामध्ये ५४३ खासदार असून त्यामध्ये सर्वाधिक प्रश्न जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून मीच विचारलेले आहे,” असे वक्तव्य केले.

यावेळी इम्तियाज जलील म्हणाले, “आम्ही प्रचार करत असून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ४५ उमेदवार असूनही चांगला प्रतिसाद आहे. लोकसभेत मी जी प्रश्न उपस्थित केलेले हे लोकांनी बघितलेले आहे. देशामध्ये ५४३ खासदार आहे त्यामध्ये जास्त प्रश्न कोणी विचारले असतील तर ते या जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून मीच विचारलेले आहे. सध्या मतदारांना मी सांगत आहे की माझ्यापेक्षा जास्त कोणी शिक्षित असेल तर त्यांना मतदान करा परंतु जाती धर्माच्या नावावर मतदान करू नका. निवडणुकीमध्ये आपण आपल्या नेत्यांना पाण्याच्या बाबतीत विचारलं असतं तर ही समस्या लवकर सुटली असती परंतु निवडणूक आली की जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करायची. हे सर्व निवडणुकीच्या तोंडावर होत असते त्यामुळे याचा नागरिक अशा अफवांना बळी पडणार नाही.”

पुढे ते म्हणाले, “आम्ही इंडिया आघाडी सोबत जाणार होतो. परंतु, आम्हाला कोणीही घ्यायला तयार नाही आमचं नेतृत्व त्यांना नको म्हणून आम्ही ‘एकला चलो रे’ चा नारा दिला. राज्यामध्ये आम्ही तीन ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. सर्व राजनीतिक पक्षांना अधिकार आहे काय काय षडयंत्र त्यांना रचायचं आहे माझ्या विरोधात एक षडयंत्र होतं मला कसं पाडायचे. मला जास्त काही टेन्शन नसतं कारण की मी पाच वर्षे काम केलेल आहे. लोकांना वाटलं मी चांगलं काम करतो तर मला मतदान करतील. विजय किंवा पराभव हे दोनच पर्याय आहेत. लोकांकडे जाणार, त्यांना भेटणार आणि त्यांना सांगणार मी काय काय काम केलेलं आहे. लोकांना एक गोष्ट सांगतो मोठमोठे भाषणे देतात तसे मी नाही करणार. मागील पाच वर्षात काय काम केलेले आहे त्याचे पुस्तक तयार करून पुस्तक वाचायला देणार जर पटलं तर ठेवा नाहीतर फाडून टाका.”

हे ही वाचा:

Uddhav Thackeray Live: कोकण हे शिवसेनेचे हृदय, गद्दारांचे दोन मालक दिल्लीत…

ठाण्यात Shinde-Fadnavis आणणार महिला राज, Meenakshi Shinde बरोबर Shweta Shalini मैदानात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss