Tuesday, May 21, 2024

Latest Posts

ठाण्यात Shinde-Fadnavis आणणार महिला राज, Meenakshi Shinde बरोबर Shweta Shalini मैदानात

ठाण्यातून लोकसभेची जागा कुणाला मिळणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ‘होमपीच’ असलेल्या ठाण्यात जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार की भाजपला मिळणार यावरच बराच खल सुरू होता . सरतेशेवटी ही जागा शिवसेना लढवणार हे निश्चित झाल्यावर त्यासाठी तीन ते चार प्रबळ दावेदार तयार झालेत. तर भाजप कडूनही दोन नेत्यांनी इच्छुकता दाखवली होती. मात्र ठाण्यात आता लोकसभेप्रमाणेच विधानसभेला ही महिला राज अवतरण्याचे संकेत मिळू लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने बघायला सुरूवात केल्याने ठाणे जिल्ह्यात धक्कादायक निर्णय होऊ शकतात.

ठाणे भाजपकडून माजी खासदार डॉ. संजीव गणेश नाईक यांनी प्रचारही सुरू केला आहे. ठाणे शहरचे भाजपा आमदार संजय केळकर लोकसभेसाठी इच्छुक होते. या मतदार संघातून संजीव नाईक यांना संधी मिळावी अशी देवेंद्र फडणवीस यांची ईच्छा आहे. आता जागा शिवसेनेला गेल्याने इथून विधानपरिषदेचे माजी आमदार रविंद्र फाटक, ओवळा – माजिवड्याचे आमदार प्रताप सरनाईक, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांची नावे जोरदार चर्चेत असताना गेल्या रविवारी सुमारे २५ हजार महिला कार्यकर्त्यांना शक्तीप्रदर्शनासाठी एकत्र करणाऱ्या माजी महापौर आणि महिला आघाडीच्या प्रमुख नेत्या मिनाक्षी शिंदे यांनी ऐन मौकेपर चौका मारला आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण करताना ठाण्यातल्या खासदाराचा इच्छेविरूध्द वागणूकीतून दिल्लीसह ठाण्यात ताप नको हा विचार करणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंना मिनाक्षी शिंदेंच्या रूपाने आयता उमेदवार मिळाला आहे. ठाण्याच्या राजकारणात मिनाक्षी शिंदे या ‘डॅशिंग लेडी’ म्हणून परिचीत असल्यातरी त्या नरेश म्हस्के यांच्याच गटातील म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे लोकसभेच्या तिकीटासाठी म्हस्के-शिंदे यापैकी कुणाचीही वर्णी लागली तरी नरेश म्हस्के गट बाजी मारू शकतो.

ओवळा- माजिवड्याचे आमदार प्रताप सरनाईक यांना मंत्रीपदाची स्वप्ने बरेच महिने पडत आहेत .त्यांच्या ईडी चौकशी मुळे त्यांनी आस्तेकदम मार्गक्रमण सुरू केले आहे. मात्र लोकसभेनंतर सरनाईक यांचे मंत्रीपद आणि म्हस्के यांची विधान परिषद याबाबतचा निर्णय प्रत्यक्षात येऊ शकतो. त्यामुळे रविंद्र फाटक की मिनाक्षी शिंदे यांच्याबाबतचा निर्णय मुख्यनेते एकनाथ शिंदे काय घेतात याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. महिलांच्या नारी शक्ती विधेयकानुसार आगामी काळात एक तृतियांश जागा महिलांना मिळणार आहेत. त्याची मुहूर्तमेढ ठाण्यातून करण्याची संधी मिनाक्षी शिंदेंच्या रूपाने मुख्यमंत्री शिंदे यांना मिळणार आहे. अर्थात रविंद्र फाटक यांचे गल्ली ते दिल्ली असलेले लक्ष्मीमित्रांचे जाळे पाहता ते पक्षांवर वेगळा प्रभाव टाकू शकतात. त्यावेळी मुख्यमंत्री ठाण्यातील रणरागिणींबरोबर राहतील की फाटकांच्या बाजूने याचा फैसला व्हायला काहीच तास आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ठाण्यातून आपले महिला कार्ड वापरायला सुरूवात केली आहे. ठाण्यातील १४६-ओवळा- माजिवडा हा मतदार संघ येत्या विधानसभेला वाटाघाटीत भाजप स्वतःकडे राखणार आहे. २०१९ च्या निवडणूकीत भाजप उमेदवाराने कच खाल्याने प्रताप सरनाईक यांची थोडक्यात सरशी झाली होती. त्यामुळे फडणवीस यांच्या हिटलिस्टवर हा मतदार संघ आहे. या मतदार संघातून भाजपच्या आयटी सेलच्या प्रमुख श्वेता शालिनी या निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. लोकसभेसाठी त्यांना प्रचाराकरता उतरवून पक्षीय पातळीवरून व्यूहरचना करण्यात आली आहे. मंडई, प्रमुख चौक या भागात त्यांच्या सभा लावून त्यांचा चेहरा आता पासूनच लोकापर्यंत पोहचवण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. या मतदार संघासाठी माजी खासदार संजीव नाईक हे प्रभारी म्हणून काम पहात आहेत. मेकॅनिकल ईंजिनिअर असलेल्या श्वेता शालिनी या देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजल्या जातात. उत्तरप्रदेशातील ब्राम्हण कुटुंबातील असलेल्या श्वेता शालिनी बहुराष्ट्रीय कंपनीत उच्चपदस्थ म्हणून काम करत होत्या. ‘देश में नरेंद्र, राज्य में देवेंद्र’ हे घोषवाक्य बनवून त्यांनी २०१९ च्या निवडणूकीत धमाल उडवून देताना प्रचार मोहिम एका वेगळ्या पातळीवर नेली होती. त्यानंतर आज पर्यंत चार वेळा मुख्यमंत्री होऊनही जे शरद पवारांना जमले नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करताना आमदारांचे शतक (१०६) झळकावले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच्या कल्पनेतील नारी विधेयक राबवण्यासाठी ठाण्याची निवड केली तर मुख्यमंत्र्यांच्या होमपीचची वेगळी ओळख गल्ली ते दिल्ली निर्माण होणार आहे.

हे ही वाचा:

Sadabhau Khot यांच्या Sharad Pawar यांच्यावरील ‘त्या’ वक्तव्याचा Rohit Patil यांनी घेतला चांगलाच समाचार

Sonu Sood चे WhatsApp बंद? कारण काय?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss