spot_img
Thursday, February 22, 2024
spot_img

Latest Posts

‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये वाद

'बिग बॉस 17'च्या घरात अंकिता लोखंडे पती विकी जैनसोबत ही सहभागी झालीये. तर घरात गेल्या नंतर या दोघांनमध्ये सतत खटके उडताना दिसुन येत आहे, मोठा वाद हा बघला मिळतोय

‘बिग बॉस 17’च्या घरात अंकिता लोखंडे पती विकी जैनसोबत ही सहभागी झालीये. तर घरात गेल्या नंतर या दोघांनमध्ये सतत खटके उडताना दिसुन येत आहे, मोठा वाद हा बघला मिळतोय. आता अंकितावर पती वुकी जैन खुप भडकला असल्यास दिसुन येत आहे.

बिग बॉस 17ची सुरुवात ही चांगलीच चर्चेत आली आहे.विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत. नुकताच बिग बॉसच्या घरात अंकिता लोखंडे हिचा क्लास विकी जैन याने लावला. यावेळी विकी जैन हा अंकिता लोखंडे हिला आरसा दाखवताना दिसला. इतकेच नाही तर थेट विकी अंकिताला म्हणतो की, तुझ्या या वागण्यामुळे मला लाज वाटत आहे. तू अशाप्रकारचे वागणे कधी बंद करणार? यावेळी विकी हा अंकिताला खडेबोल सुनावताना दिसतोय. अंकिता लोखंडे ही बिग बॉस 17 मध्ये पती विकी जैन याच्यासोबत सहभागी झालीये. मात्र, बिग बॉस 17 च्या घरात सहभागी झाल्यापासून विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये मोठा वाद हा बघायला मिळतोय. नेहमीच यांच्यामध्ये भांडणे होतात. अंकिता लोखंडे ही बिग बॉस 17 मध्ये सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धेक असल्याचे सांगितले जाते. बिग बॉसच्या घरात अंकिता ही मोठा धमाका करेल, असे सांगितले जात होते. नुकताच अभिषेक आणि विकी जैन हे गार्डन परिसरात गप्पा मारत बसले. मात्र, विकी जैन हा अभिषेक याला बोलत असल्याचे अजिबात अंकिता लोखंडे हिला आवडले नाही. कारण घरात अन्नावरून अभिषेक आणि अंकितामध्ये मोठा वाद झाला.

विकी जैन आणि अभिषेक गप्पा मारत बसलेले असताना अंकिता तिथे जाते आणि विकीला रागीट असा लूक देते. हे अभिषेक याच्या लक्षात येते आणि तो तिथून उठून जातो. मग त्यानंतर अंकिता लोखंडे हिला विकी चांगलेच खडेबोल सुनावतो. तो थेट म्हणतो की, हे असे वागणे बंद कर. त्यानंतर अंकिता लोखंडे ही विकीची माफी मागताना देखील दिसत आहे. या सर्व प्रकारानंतर अंकिता लोखंडे हिला सोशल मीडियावर सुनावले जात आहे. एकाने लिहिले की, विकी जैन हा अगदी बरोबर आहे. दुसऱ्याने लिहिले की, मी या अंकिता लोखंडे हिला फार जास्त समजदार समजत होतो परंतू मी चुकीचा आहे. बिग बॉस 17 मध्ये मोठे भांडणे देखील सतत बघायला मिळत आहेत. बिग बॉसच्या निर्मात्यांनी नुकताच मोठी खेळी खेळलीये.तर जसजसा बिग बॉसचे एपिसोड पुढे जातील तसतसा बिग बॉसच्या घरातील राडे,तमाशे,भांडणं हे सगळ काही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा : 

संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात…

 ‘रंग माझा वेगळा’ फेम दीपा पोहोचली अनघा अतुलच्या हॉटेलमध्ये

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss