Saturday, May 18, 2024

Latest Posts

‘ झिम्मा २’ फेम शिवानी सुर्वे लवकरच अडकणार लग्नबंधनात ? शेअर केलेला व्हिडिओ होतोय व्हायरल

अभिनेत्री शिवानी सुर्वे सध्या ‘झिम्मा २’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे.या चित्रपटातील तिची भुमिका देखील उत्तम होती,या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर कमालीची कामगिरी केली आहे.

सध्या मनोरंजनसृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहेत. प्रसाद-अमृता, प्रथमेश-मुग्धा यांच्यानंतर शिवानीही लग्नबंधनात अडकणार अशी शक्यता नाकारता येत नाही.अभिनेत्री शिवानी सुर्वे सध्या ‘झिम्मा २’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे.या चित्रपटातील तिची भुमिका देखील उत्तम होती,या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर कमालीची कामगिरी केली आहे.दरम्यान शिवानी छोट्या पडद्यावरील ‘देवयानी’ या मालिकेतून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.तसचं ‘बिग बॉस मराठी’ मधून ती घराघरात पुन्हा नव्यानं पोहचली त्यानंतर मालिकांमधून मिळालेल्या यशानंतर ती हळुहळू चित्रपटांकडे वळली. वैयक्तिक आयुष्यात शिवानी ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेता अजिंक्य ननावरेला डेट करत आहे.

अजिंक्य व शिवानीची जोडी मराठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र असलेली ही जोडी लग्न केव्हा करणार याबद्दल अनेकदा चर्चा होताना दिसतात.तर नुकताच शिवानीने शेअर केलेल्या एका नव्या व्हिडीओमुळे  पुन्हा एकदा अजिंक्य-शिवानीच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत.दरम्यान शिवानी या व्हिडीओमध्ये साडी खरेदी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच्या कॅप्शनमध्ये शिवानीने “या आठवड्यात माझ्या आईला मी हा व्हिडीओ पाठवला. २०२४ मध्ये काहीतरी खास…” असं लिहिलं आहे.दरम्यान ती ज्या प्रकारे साडीचे कलेक्शन निवडत आहे,त्यावरुन ती लग्नाची तयारी करत आहे असं दिसून येत आहे,मात्र शिवानीने थेट तशी माहिती दिलेली नाही.

शिवानीच्या या व्हिडिओवर अजिंक्यही हसला आहे. तर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि ऋतुजा बागवेने व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. तसचं नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर “तुम्ही दोघं लग्न करणार आहात का?”, “तुमचं लग्न आहे का?” अशा कमेंट्स केल्या आहेत. याशिवाय नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे सध्या शिवानी-अजिंक्यच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरेची पहिली भेट ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. पुढे दोघांच्या मैत्रीचं रुपांत प्रेमात झालं. २०१७ पासून शिवानी-अजिंक्य एकत्र असून लवकरच दोघ लग्नं करणार आहेत.दरम्यान आता शिवानी-अजिंक्य कधी लग्नं करणार? हा प्रश्न आता सगळ्या चाहत्यानाही पडला आहे.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss