Saturday, May 18, 2024

Latest Posts

दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार महाराष्ट्राची लाडकी अप्सरा!,सोनालीने व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार महाराष्ट्राची लाडकी अप्सरा!,सोनालीने व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

सध्या मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच कोणत्यानं कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असते.आता सोनाली तिच्या नविन कामाला सुरुवात करणार असल्यामुळे चर्चेत आहे,लवकरच सोनाली दाक्षिणात्य चित्रपटात काम करताना दिसून येणार आहे.दरम्यान मराठी कलाविश्वातील प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, श्रृती मराठे, सचिन खेडेकर अशा अनेक कलाकारांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यादीत आता लवकरच मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीचं नावं जोडलं जाणार आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणीही नसून महाराष्ट्राची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी आहे.

सोनाली कुलकर्णी लवकरच मल्याळम चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहनलालसह स्क्रीन शेअर करणार आहे. ‘मलाइकोट्टई वालीबान’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री पहिल्यांदाच मल्याळम सिनेसृष्टीत काम करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोनालीच्या दाक्षिणात्य पदार्पणाच्या चर्चांना उधाण आलं आहे. अखेर तिने या सिनेमाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.दरम्यान सोनाली सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते,ती तिच्या चाहत्यांना तिच्या बाबतचे नवनविन अपडेट सोशल मीडियाच्या माध्यामातून देत असते.सोनालीचा चाहता वर्ग देखील बराच मोठा असल्याने तिचे चाहते तिच्या प्रत्येक पोस्टला चांगलाच प्रतिसाद देत असतात.

सुपरस्टार मोहनलाल प्रमुख भूमिका साकारत असलेल्या ‘मलाइकोट्टई वालीबान’ चित्रपटाचा पहिला लूक आणि टीझर सोनालीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अभिनेत्रीची थेट दक्षिणेत वर्णी लागल्याने तिच्या चाहत्यांनी सोनालीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. जानेवारी २०२३ पासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. जानेवारी ते जून २०२३ या ६ महिन्यांच्या कालावधीत सोनालीने या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. पुढच्या वर्षी २५ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, सोनालीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्री लवकरच मोठ्या पडद्यावर ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ यांच्या भूमिकेत झळकणार आहे. तिने यापूर्वी ऐतिहासिक भूमिका साकारलेल्या ‘हिरकणी’ चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.दरम्यान सोनालीने आतापर्यंत साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत तिला प्रेक्षक चांगलाच प्रतिसाद देत असतात.आता यावेळी सोनाली दाक्षिणात्य चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने चाहते देखील तिच्या या नविन बाजू पाहण्यासाठी उस्तुक आहेत.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss