ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी क्रिस्टल कंपनीवर केलेल्या आरोपानंतर आज विधानभवनाच्या परिसरात भाजपचे (BJP) आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलत असताना प्रसाद लाड यांची जीभ घसरली आहे.
यावेळी माध्यमांशी बोलत असताना भाजपचे आमदार प्रसाद लाड म्हणाले आहेत की, “संजय राऊत चुXX झालाय. ज्या गोष्टीचा संबंध नाही, कोणत्या माहितीचा आधार नाही. कशामध्ये नाव घ्यायचं, कशात नाही घ्यायचं, हे कळत नाही. अशा माणसाला हीच संसदीय भाषा वापरली पाहिजे.” “उधळलेल्या रेडकू असतो, ना त्याला भाल्यानं मारायचं असतं. आणि म्हणून त्या रेडकुला भाल्यानं मारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आक्रमकपणा आला आहे. ज्यानं मेहनतीनं उभं केलेलं साम्राज्य, खोटारड्यापणामुळे त्याला डाग लागत असेल, तर छत्रपतींनी दिलेली शिकवण आहे, ‘अंगावर आलं तर, घ्यायचं शिंगावर”, असं प्रसाद लाड म्हणाले आहेत.
तसेच प्रसाद लाड पुढे म्हणाले आहेत की, “आपल्या माध्यमातून मी संजय राऊत यांना सांगू इच्छितो, याच्यापुढे त्यांनी माझं किंवा माझ्या कंपनीचं नाव घेतलं, तर स्वप्नातला संजय राऊत काय आहे? हे मी मीडिया समोर आणेल. त्याचे व्हिडीओ जनतेसमोर आणेल आणि मी माझ्या वकिलांशी चर्चा करून, अब्रु नुकसानीचा किमान 200 ते 500 कोटींचा दावा संजय राऊतांवर उद्या सकाळपर्यंत दाखल करतोय.”, असं प्रसाद लाड म्हणाले आहेत. संजय राऊतांनी यापुढे माझं किंवा माझ्या कंपनीचं नाव घेतलं, तर स्वप्नातले संजय राऊत काय आहेत? मीडियासमोर आणेल, असा गंभीर इशारा प्रसाद लाड यांनी दिला आहे. तसेच, संजय राऊतांविरोधात 500 कोटींचा मानहानीचा दावा करणार असल्याचंही प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. दरम्यान, संजय राऊतांवर बोलताना प्रसाद लाड आक्रमक झाले आहेत. संजय राऊत सातत्यानं माझा आणि माझ्या कंपनीचा उल्लेख करत आहेत, असं म्हणत प्रसाद लाड यांनी राऊतांवर थेट टीकास्त्र डागलं.
हे ही वाचा:
पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील चार विद्यार्थिंनीचा देवगडच्या समुद्रात बुडून मृत्यू
जालन्यात धनगर समाज आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्ग टायर पेटवून आंदोलन