Sunday, May 19, 2024

Latest Posts

EXLUSIVE एखाद्या छोट्या गोष्टीची सुरुवात पंतप्रधानांनी सुरू केल्यावर ती किती मोठी होऊ शकते ‘मन की बात’ मधून छान उदाहरण – सचिन खेडेकर

Sachin Khedekar : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या आकाशवाणीवरून सादर होणाऱ्या आजच्या शतकी कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विलेपार्ले येथील घैसास सभागृहात उपस्थित होते.

Sachin Khedekar : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या आकाशवाणीवरून सादर होणाऱ्या आजच्या शतकी कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विलेपार्ले येथील घैसास सभागृहात उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते सचिन खेडेकर यांच्यासोबत टाईम महाराष्ट्रने EXLUSIVE संवाद साधला आहे. ‘मन की बात’ कार्यक्रमाविषयी जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा देशाचे पंतप्रधान जेव्हा लोकांसाठी, लोकांच्या गोष्टी सांगतात आणि साध्या साध्या गोष्टी सांगतात. लोकांना प्रोत्साहित करतात त्यांच्या मनामध्ये जागा मिळवतात. देशातील पहिल्या नागरिकाला वेळात वेळ काढून हे पंतप्रधान म्हणून हे करता येऊ शकत ही खूप प्रोत्साहन देणारी गोष्ट असल्याचं अभिनेते सचिन खेडेकर म्हणाले आहेत.

१०० मालिकांच्या या काळामध्ये कोणती गोष्ट तुमच्या कायम स्मरणात राहणारी आहे असा प्रश्न जेव्हा टाईम महाराष्ट्रने सचिन केहेडेकर यांना विचारला तेव्हा सचिन खेडेकर यांनी मला हीलिंग हिमालयचा जो भाग होता तो आवडला. आपल्याकडे महाराष्ट्रमध्ये गड संवर्धनाबद्दल बोललं जातं, परंतु हिमालयामध्ये असलेला सगळा कचरा आणि हिमालयाचं हिलिंग करणारी ही मंडळी याने मी खूप भारावून गेलो असल्याचं यावेळी सचिन खेडेकर म्हणाले आहे. त्यांच्या छोट्याश्या कामाला मन की बात मधून इतकी मोठी प्रसिद्धी मिळाली, त्यांच्यासोबत अनेक माणसं जोडली गेली. मला असं वाटतं एखादा छोट्या गोष्टीची सुरुवात प्रधानमंत्री यांनी केल्यानंतर ती गोष्ट किती मोठी होऊ शकते याचं हे छान उदाहरण असल्याचं अभिनेते सचिन खेडेकर यावेळी म्हणाले आहे.

करिअरच्या सुरुवातीला अभिनेते सचिन खेडेकर यांचा आकाशवाणीची जवळचा संबंध असल्याने त्यांच्या अनुभवाला अनुसरूनच जेव्हा सचिन खेडेकर यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा आकाशवाणी आणि दूरचित्रवाणीवर माझा मनापासून खूप मोठा विश्वास आहे. याचं कारण असे की आपल्याकडे कितीही व्यावसायिक किंवा सॅटेलाईट चॅनल आले तरी आज जी सरकारी व्यवस्था आहे, जी तळगाळातील माणसापर्यंत पोहोचणारी आहे. त्याच्यामध्ये आकाशवाणी ही अग्रेसर आहे. आपण कितीही नाकारलं तरी त्यांचं कार्यक्षेत्र वादातीत आहे. मी आकाशवाणीचा मूळ कलाकार असल्यामुळे मला आकाशवाणीचा खूप अभिमान वाटतो असं मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते सचिन खेडेकर यांनी टाईम महाराष्ट्र सोबत बोलताना सांगितला आहे.

हे ही वाचा : 

मुख्यमंत्री पदासाठी नवा दावेदार तयार होण्याची शक्यता – अमोल कोल्हे

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss