प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री Vaibhavi Upadhyaya चा कार अपघातात मृत्यू

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अपघाताचे सत्र हे सुरूच आहे. मोठं मोठे मार्गावर (Expressway) आणि अपघात यांचं जणू एक समीकरणच जुळलं आहे. रोज कुठे ना कुठे अपघात हा होतच असतो. अश्यातच टीव्ही इंडस्ट्रीतून एक अतिशय धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर येत आहे.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री Vaibhavi Upadhyaya चा कार अपघातात मृत्यू

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अपघाताचे सत्र हे सुरूच आहे. मोठं मोठे मार्गावर (Expressway) आणि अपघात यांचं जणू एक समीकरणच जुळलं आहे. रोज कुठे ना कुठे अपघात हा होतच असतो. अश्यातच टीव्ही इंडस्ट्रीतून एक अतिशय धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर येत आहे. लोकप्रिय मालिका ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय आता नाही. या अभिनेत्रीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे.

‘साराभाई वर्सेस साराभाई 2’ या शोमध्ये जॅस्मीन ही भूमिका साकारणारी अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचं निधन झालं आहे. अभिनेत्रीच्या निधनाचे वृत्त समोर येताच टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. वैभवी उपाध्याय यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने सेलिब्रिटींसह चाहत्यांना हादरवून सोडले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये एका कार अपघातात वैभवीचा मृत्यू झाला. ती ३२ वर्षांची होती. चंदिगडमध्ये असलेले तिचे कुटुंबीय मृतदेह मुंबईत आणत आहेत. बुधवारी सकाळी ११ वाजता मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. या हृदयद्रावक घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

वैभवी एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री होती. त्याने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. पण ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेतून अभिनेत्रीला मोठी ओळख मिळाली. या शोमधील तिच्या पात्राचे नाव जस्मिन होते. अभिनेत्रीच्या भूमिकेला आणि अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. टीव्ही शोशिवाय वैभवीने दीपिका पदुकोणच्या छपाक चित्रपटातही काम केले होते. वैभवी उपाध्याय टीव्ही शो ‘साराभाई व्हर्सेस साराभाई 2’, ‘क्या कसूर है अमला का’, वेब सीरिज ‘प्लीज फाइंड अटॅच्ड’ आणि ‘छपाक’ चित्रपटातही दिसली होती. वैभवी उपाध्याय हे गुजराती थिएटर सर्किटमध्ये खूप लोकप्रिय नाव होतं. त्यामुळेच वैभवीच्या या धक्कादायक निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

हे ही वाचा : 

Manipur मध्ये माजी आमदाराने भडकवली दंगल, तब्बल ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर Jayant Patil यांनी दिली पहिली प्रतिक्रिया….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version