Friday, April 26, 2024

Latest Posts

Manipur मध्ये माजी आमदाराने भडकवली दंगल, तब्बल ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

ईशान्येकडील राज्य म्हणजेच मणिपूरमध्ये दंगलीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हा हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही आहे.

ईशान्येकडील राज्य म्हणजेच मणिपूरमध्ये दंगलीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हा हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. काल दिनांक २२ मे, सोमवार रोजी मणिपूरमध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राजधानी इंफाळच्या न्यू लॅम्बुलेन भागात जमावाने घरे जाळली. यानंतर लष्कर आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.

संपूर्ण राज्यात हिंसाचार भडकल्यामुळे मणिपूरमध्ये पुन्हा एकदा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. सोमवारी राज्यात सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत संचारबंदी देखील लागू करण्यात आली होती. जाळपोळीची बातमी आल्यानंतर ५ दिवस इंटरनेटही बंद करण्यात आले आहे. असे सांगितले जात आहे की, सोमवारी सकाळी इंफाळच्या न्यू चेकन बाजार परिसरात हिंसक चकमक झाली. जाळपोळीच्या घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

इम्फाळच्या चेकोन भागात हिंसाचार भडकवल्याप्रकरणी माजी आमदारासह ३ सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आज माजी आमदारासह तीन जणांना पोलिसांनी इम्फाळ पूर्वेतील न्यू चेकॉन (न्यू लेम्बुलेन) येथून अटक करण्यात आली आहे.

मणिपूरच्या गृहविभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, कोणत्याही प्रकारचा अपप्रचार आणि अफवा पसरू नयेत यासाठी पुढील ५ दिवस म्हणजेच २६ मे पर्यंत इंटरनेट सेवेवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच या निवेदनात म्हटले आहे की, काही समाजकंटक सोशल मीडियाचा वापर द्वेष आणि अफवा पसरवण्यासाठी करतात, ज्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकल्यानंतर लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इम्फाळच्या सीमेवर झालेल्या चकमकीच्या वृत्तावर लष्कर आणि आसाम रायफल्सच्या तुकड्या पाठवण्यात आल्या. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. मणिपूरने यापूर्वी ३ मेपर्यंत इंटरनेट सेवा बंद केली होती.

हे ही वाचा:

मुंबईकरांसाठी खुशखबर! ताडदेव, दादरसह अनेक ठिकाणी म्हाडाच्या घरांच्या सोडती

Jayant Patil यांची आज ED चौकशी, मुंबई कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक

या देशाला एक लहरी राजा मिळाला, संजय राऊत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss