Monday, May 20, 2024

Latest Posts

राजकारणात एन्ट्री करण्याबाबत कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया

बॉलीवूडची पंगाक्विन म्हणजेच कंगना रणौत ही नेहमीच कोणत्यान कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असते.

बॉलीवूडची पंगाक्विन म्हणजेच कंगना रणौत ही नेहमीच कोणत्यान कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असते.कधी वैयक्तिक विषयांवर तर कधी तिच्या रोखठोक वक्तव्यामुळे चर्चेचा विषय बनते.काहीवेळा तर तिला त्यावरुन तिला अनेकदा ट्रोलही व्हावे लागले आहे.तर नुकतच कंगनाने केलेल्या एका वक्तव्यामुळे ती चर्चेचा विषय ठरली आहे.कंगनानं यापूर्वी देखील तिच्या राजकीय प्रवेशाविषयी वक्तव्यं केली आहे.आता एका मुलाखतीमध्ये तिला पुन्हा त्यावरुन विचारण्यात आलेल्या प्रश्नावर तिनं दिलेलं उत्तर तिच्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय आहे.

सध्या कंगनाचा इमर्जन्सी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तर या चित्रपटात कंगना भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे.त्यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट असणार आहे.जून महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.या चित्रपटाच्या निमित्तानं तिनं दिलेल्या एका मुलाखतीतलं ते वक्तव्य लक्ष वेधून घेत आहे.

कंगनाला त्या मुलाखतीमध्ये तुला देशाचा प्रधानमंत्री व्हायला आवडेल का असा प्रश्न विचारण्यात आला होता.त्यावर तिनं दिलेलं उत्तर हे चर्चेत आहे. कंगनाच्या त्या चित्रपटातील इंदिरा गांधी यांच्या भूमिकेतील लूक पाहून तिचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं होतं. त्यानंतर या चित्रपटाचे चाहत्यांना वेध लागले आहेत.कंगना म्हणते, कला हा एक व्यवसाय आहे. कलाकारांवर सरस्वती देवीची कृपा असते. तुम्हाला माहिती आहे की, आपण राजकारणाकडे कोणत्या नजरेनं पाहतो. त्या जगात जाण्याची माझी काही इच्छा नाही. मला त्याचा भागही व्हायचं नाही. मी कलाकार आहे आणि मला तेच काम करायला आवडेल.मला जर देशाची सेवा करण्याची एखादी संधी मिळाली तर मी नक्कीच राजकारणात जाईल. देशाला माझी गरज असल्यास मी त्या पर्यायाचा नक्की विचार करेल. असेही कंगनानं तिच्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे. अमर उजालानं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

2023 मध्ये ट्वीटरवर कंगनाने म्हटले होते की मी कोणतीही राजकीय नेता अथवा व्यक्ती नाही. , मी एक संवेदनशील आणि समजूतदार व्यक्ती आहे. कोणतीही राजकीय व्यक्ती नाही. राजकारणात येण्याासाठी अनेकांनी आग्रह केला. मात्र, मी कधीही राजकारणात उतरण्याबाबत निर्णय घेतला नाही. मात्र, नोव्हेंबर महिन्यातच कंगनाने लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. दरम्यान आता प्रेक्षकांमध्ये कंगनाच्या आगामी इमर्जन्सी  या चित्रपटाची उस्तुकत्ता आहे.

हे ही वाचा: 

उद्धव ठाकरे हा बेअक्कल माणूस आहे; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

आळंदीमधील इंद्रायणी नदीवरील प्रदूषणावर तात्काळ कारवाई होणार;उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss