Tuesday, April 16, 2024

Latest Posts

उद्धव ठाकरे हा बेअक्कल माणूस आहे; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नुकतेच तीन दिवसांपूर्वी कोकण दौऱ्यावर होते.

ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नुकतेच तीन दिवसांपूर्वी कोकण दौऱ्यावर होते. उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे (Narayan Rane) असा वाद मागील काही दिवसांपासून सुरु आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी कोकण दौऱ्या दरम्यान अनेकांवर टीका केली आहे. ठाकरेंनी केलेल्या टीकेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे हा बेअक्कल माणूस आहे,असे म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे.

दरम्यान यांवर बोलताना नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरेच तुम्ही नाव का काढता, बेअक्कल माणूस आहे. राष्ट्रपती राजवट कधी लावली जाते याचा त्याला ज्ञान आहे का?, त्यामुळे तुम्ही त्याचं नाव घेत अपशकुन करत जाऊ नका असं नारायण राणे पत्रकारांना म्हणाले. तसेच, त्याला हवे त्या भाषेत मी प्रत्युत्तर देईल. त्याला माझी सर्व क्षमता माहित असून, तो माझ्यासमोर येऊ शकत नाही. त्यामुळे त्याला काय बघायचं. तो काही माझा स्पर्धक नाही. मी केंद्रीय मंत्री आहे, असे नारायण राणे म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे मनोरुग्ण आहेत या टीकेला उत्तर देताना नारायण राणे म्हणाले, मनोरुग्ण उद्धव ठाकरे आहे. मनोरुग्ण नाही तर वेडसर आहे तो, काहीही बोलत असतो,असे राणे म्हणाले. शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांना मंत्रिपद देण्यासाठी १ कोटींचा चेक दिला होता, असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले, हा गौप्यस्फोट नसून वास्तव आहे. तुम्ही जाऊन तपासा आणि चॅलेंज करा, असे नारायण राणे म्हणाले.

९ फेब्रुवारीला पुण्यात ‘निर्भया बनो’ या कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले, निखिल वागळे यांची गाडी फोडली नाही, त्याला चोप दिला आहे. त्यामुळे फोडली म्हणू नका चोप दिला म्हणा, असे काम केल्यावरच असे होणार. बाकीच्याची पण तीच दशा होईल, असे नारायण राणे म्हणाले.

हे ही वाचा: 

आळंदीमधील इंद्रायणी नदीवरील प्रदूषणावर तात्काळ कारवाई होणार;उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आरोप

सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss