Sunday, May 19, 2024

Latest Posts

कांतारामधील ‘ह्या’ अभिनेत्याने म्हटले ‘KGF 2’ ला माईंडलेस, फ्लॉप चित्रपटांशीही केली तुलना

आश्चर्याची गोष्ट म्हणजे किशोरने 'केजीएफ' बद्दल असे मत व्यक्त केले असताना, यशने त्याच्या एका मुलाखती दरम्यान गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 'कंतारा'चे कौतुक केले होते.

ब्लॉकबस्टर ॲक्शन थ्रिलर चित्रपट ‘कंतारा’ मधील पोलीस अधिकारी मुरलीधरच्या भूमिकेसाठी कौतुकाचा पात्र ठरलेला अभिनेता किशोर कुमार सध्या चर्चेत आला आहे. किशोर कुमार याने अलीकडेच त्याचे ट्विटर हँडल हॅक झाल्यानंतर ‘KGF: Chapter 2’ वर त्यांचे मत स्पष्टपणे शेअर केले आहे. अभिनेत्याला एका मुलाखतीत विचारण्यात आले की, त्याने यशचा चित्रपट पाहिला आहे का, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट बनला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना किशोरने खुलासा केला की त्याला KGF चित्रपटाची कथा सांगण्याची शैली अजिबात आवडली नाही.

 

किशोर कुमार म्हणाले, ‘मला माहित नाही की ते बरोबर आहे की अयोग्य पण मी KGF 2 पाहिलेला नाही. हा माझ्या टाईपचा सिनेमा नाही. ही माझी वैयक्तिक पसंती आहे. मला एक छोटासा चित्रपट पाहायला आवडेल जो फ्लॉप ठरला आहे, पण एखादा बिनडोक सिनेमा मला पाहायला आवडणार नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे किशोरने ‘केजीएफ’ बद्दल असे मत व्यक्त केले असताना, यशने त्याच्या एका मुलाखती दरम्यान गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ‘कंतारा’चे कौतुक केले होते. त्यामुळे आता किशोरच्या या अशा प्रतिक्रियेमुळे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत मतभेद निर्माण होतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

‘कंतारा’ आणि ‘पोनियिन सेल्वन: १’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा भाग असलेला अभिनेता किशोर कुमारचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले होते. खरं तर, किशोर अनेकदा आपल्या ट्विटर अकाऊंटवर देशातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आवाज उठवत असतो, त्यामुळे किशोर नेहमीच चर्चेत असतो. मात्र, नंतर अभिनेत्याचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचे उघड झाले आणि त्याचमुळे त्याचे अकाउंट सस्पेंड करण्यात आले.

किशोरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, तो शेवटचा मणिरत्नम दिग्दर्शित पोनियिन सेल्वनमध्ये दिसला होता. यात चियान विक्रम, कार्ती, जयम रवी, ऐश्वर्या लक्ष्मी आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा एक मल्टिस्टारर चित्रपट असल्याने, किशोर फारसा हायलाइट झाला नाही तर कांतारामधील त्याच्या व्यक्तिरेखेचे ​​चांगले कौतुक झाले. किशोर लवकरच रेड कॉलरसह हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार आहे, जो एक सस्पेन्स-थ्रिलर असल्याचे म्हटले जाते. याचे दिग्दर्शन चंद्रशेखर बंदिअप्पा यांनी केले आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधानांना “हे” शोभत नाही, राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा

उर्फीचा ‘हा’ फोटो होतोय सोशल मीडियावर व्हायरल, यावेळी अपूर्ण नव्हे तर पूर्ण कपड्यांमुळे होतेय उर्फी होतेय ट्रोल

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss