Tuesday, February 27, 2024

Latest Posts

अ‍ॅनिमलच्या यशानंतर तृपी डिमरी करणार कार्तीक आर्यनसोबत स्क्रीन शेअर

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल'या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला.प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगलीच पसंती दर्शवली आहे.

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला.प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगलीच पसंती दर्शवली आहे,चित्रपटातील रणबीर,रश्मिका च्या भूमिकेला देखील चांगली पसंती दाखवली आहे.मात्र या सिनेमात जास्त भाव खाऊन गेलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी मात्र या सिनेमातील छोट्या भूमिकेमुळे देखील रातोरात प्रसिद्धि झोतास आली,या सिनेमामुळे तिला नॅशनल क्रश म्हणून ओळख मिळाली.

सध्या तृप्ती तिच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटानंतर तृप्ती डिमरीला एकापेक्षा एक जबरदस्त प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळत आहे. विकी कौशलनंतर आता तृप्ती डमरी बॉलिवूडचा हँडसम हंक कार्तिक आर्यनसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.कार्तिक आर्यन लवकरच त्याच्या मोस्ट अवेटेड ‘आशिकी 3’ सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.तर आता कार्तिकसोबत ‘आशिकी 3’ या चित्रपटात तृप्ती डिमरी  मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची बातमी समोर येत आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही जोडी आता चित्रपटासाठी निश्चित झाली आहे. ही बातमी समजल्यानंतर केवळ कार्तिकच नाही तर तृप्तीचे चाहतेही आनंदात आहेत.त्यामुळे चाहते देखाल कार्तिक आणि तृप्तीला एकत्र पाहण्यासाठी आतुर आहेत.

दरम्यान तृप्तीच्या आधि या चित्रपटासाठी कार्तिकसोबत तारा सुतारियाच्या नावाची वर्णी लागली होती.मात्रएका मीडिया रिपोर्टनुसार, कार्तिक आर्यन आता तारा सुतारियासोबत नाही तर ‘आशिकी 3’ मध्ये तृप्ती डिमरीसोबत दिसणार आहे. आशिकी फ्रँचायझीचा हा तिसरा चित्रपट आहे. जिथे राहुल रॉय आणि अनु अग्रवाल ‘आशिकी’मध्ये दिसले होते. तर ‘आशिकी 2’ मध्ये आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांची जबरदस्त केमिस्ट्री चित्रपटात पाहयला मिळाली होती.आता अनुराग बासू ‘आशिकी 3’ चं दिग्दर्शन करणार आहे.

तृप्ती डिमरी संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात रणबीर कपूरसोबत रोमान्स करताना दिसली होती. या चित्रपटातील दोघांच्या इंटिमेट सीनची बरीच चर्चा झाली होती. या चित्रपटातून तृप्तीने सर्वांच्या मनावर राज्य केलं. अनुराग बासू दिग्दर्शित ‘आशिकी 3’ च्या शूटिंगला 2024 मध्ये सुरूवात होणार आहे.दरम्यान आता प्रेक्षक तृप्ती आणि कार्तिकची जोडी स्क्रिनवर कशी दिसेल हे पाहायला खुप उस्तुक आहेत.

Latest Posts

Don't Miss