Friday, May 17, 2024

Latest Posts

‘कौन बनेगा करोडपती’चा पहिला पाहुणा आमिर खान, अमिताभ बच्चनही करणार या सेलिब्रिटींचे स्वागत

अलीकडेच एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रोमो व्हिडिओमध्ये टीव्ही शोच्या प्रीमियरची तारीखही जाहीरकरण्यात आली आहे, तसेच बॉलिवूड अभिनेता आमिर खानही पहिल्या एपिसोडमध्ये दिसणार आहे.

मुंबई : अमिताभ बच्चन यांचा गेम शो ‘कौन बनेगा करोडपती’ सीझन 14 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शोचे अनेक प्रोमो व्हिडिओसमोर आले आहेत. अलीकडेच एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रोमो व्हिडिओमध्ये टीव्ही शोच्या प्रीमियरची तारीखहीजाहीर करण्यात आली आहे, तसेच बॉलिवूड अभिनेता आमिर खानही पहिल्या एपिसोडमध्ये दिसणार आहे. त्याच्यासोबत पद्मविभूषणबॉक्सिंग चॅम्पियन एमसी मेरी कोम आणि पद्मश्री सुनील छेत्री या शोचे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

‘कौन बनेगा करोडपती 14’ मध्ये, यावर्षी कारगिल युद्धातील दिग्गज मेजर डीपी सिंह, सेना पदक शौर्य कर्नल मिताली मधुमिता विशेषअतिथी म्हणून शोचा भाग असतील. KBC 14 या शोचा 7 ऑगस्ट रोजी प्रीमियर होईल आणि भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरा करण्यात येईल.

केबीसीचा नवा सीझन ७ ऑगस्टपासून सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. होस्ट अमिताभ यांनी एका प्रोमो व्हिडिओमध्ये घोषणाकेली की भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या निमित्ताने नवीन बक्षीस रकमेचा स्लॉट जोडला गेला आहे. शोच्या पहिल्या प्रोमोमध्येबनावट बातम्या दूर करण्याच्या आणि बातम्यांचे लेख वाचताना योग्य ज्ञानावर भर देण्यावर भर देण्यात आला होता. 2000 सालापासून अमिताभ ‘कौन बनेगा करोडपती’ होस्ट करत आहेत. 2007 मध्ये तिसरा सीझन शाहरुख खानने होस्ट केला होता.

Latest Posts

Don't Miss