Tuesday, May 21, 2024

Latest Posts

Rajkumar Rao आणि Janhavi Kapoor नवीन चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या सर्वत्र आयपीएलचा (IPL) हंगाम सुरु झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर एक नवीन कोरा चित्रपट घेऊन राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटाचे नाव ”मिस्टर अँड मिसेस माही” (‘Mr. and Mrs. Mahi’) असे आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँन्च झाले आहे. नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘श्रीकांत’ मध्ये (Shrikant) जान्हवी आणि राजकुमारने एकत्र काम केले होते. राजकुमार राव आणि जान्हवीचा हा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचा धुरा दिग्दर्शक शरण शर्मा (Sharan Sharma) सांभाळत आहेत. हा चित्रपट ३१ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरने (Karan Johar) केली आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकाच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या ट्रेलरमध्ये सुरवातीला राजकुमार आणि जान्हवीची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. त्या दोघांची पहिली भेट आणि नंतर लग्न असे दाखवण्यात आले आहे. पत्नी माहीसोबत राजकुमार राव क्रिकेटर होण्याच स्वप्न पूर्ण करत असल्याचे दिसत आहे. या चित्रपटात रोमांसबरोबर इमोशन पण पाहायला मिळणार आहे. त्यामळे प्रेक्षक चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट ३१ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमार रावचा ”विकी विद्या का वो वाला व्हिडिओ” हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. राजकुमार राव हा विक्कीची भूमिका ‘स्त्री – २’ या चित्रपटात साकारणार आहे.

हे ही वाचा:

AC शिवायही खोली राहील थंड, पण कशी?

Savani Ravindra चा वेगळाच अनुभव, मतदान न करताच परतली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss