Saturday, May 18, 2024

Latest Posts

Kriti Sanon झळकणार Biopic चित्रपटात, तर मनीष मल्होत्रा यांचे दिग्दर्शनात पदार्पण

लवकरच मीना कुमारी यांच्यावर बायोपिक (Biopic) तयार होत असून बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री क्रीती सॅनॉन या चित्रपटात मुख्य भोमिकेत दिसणार आहे.

चित्रपट सृष्टीतील मीना कुमारी हे नाव सगळ्यांच्याच ओळखीचे आहे. अभेनेत्रीने मीना कुमारी या नावाने बॉलीवूडमध्ये ओळख जरी मिळवली असेल तरी त्यांचे मूळ नाव ‘महजबी बानो’ असे होते. फक्त ३८ वर्ष जगणाऱ्या मीनाकुमारी यांनी चित्रपट सृष्टीत खूप मोठे नाव कमावले.त्यातच आता लवकरच मीना कुमारी यांच्यावर बायोपिक (Biopic) तयार होत असून बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री क्रीती सॅनॉन या चित्रपटात मुख्य भोमिकेत दिसणार आहे.

अभिनेत्री मीना कुमारी यांनी साकारलेल्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिल्या.आजही लोक त्यांचे चित्रपट तितकेच आवडीने पाहतात. त्यांनी साकारालेली ‘पाकिजा’ तर कोणीच विसरु शकले नाही.अभिनयाबरोबरच शेरो-शायरी करणाऱ्या मीना कुमारी यांच्या आयुष्यात अनेक अशा गोष्टी गाडल्या ज्यामुळे त्या काही काळ खचून गेल्या होत्या.त्याच सर्व गोष्टी,त्यांचा एकंदरीत प्रवास आणि अभिजात सौंदर्य लाभलेल्या अभिनेत्रीच्या आयुष्यावर आधारित बायोपिक चित्रपट येणार अशी चर्चा काहीकाळआधी सर्वत्र रंगली होती.

या बायोपिकशी (Biopic) जोडलेली एक महत्वाची बातमी समोर आली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन (Direction) फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा करणार आहे. दिग्दर्शनाच्या क्षेत्रातील हे त्यांचे पहिलेच पाऊल असून या चित्रपटाच्या माध्यमातून मनीष मल्होत्रा दिग्दर्शनाच्या (Direction) क्षेत्रात पदार्पण करणार आहे.या चित्रपटाची निर्मिती (Producers) ‘टी-सिरिज’ अन् भूषण कुमार हे करणार आहेत.या बायोपिकमध्ये (Biopic) मीना कुमारी यांची भूमिका कोणती अभिनेत्री निभावणार यावार बरीच चर्चा सुरू होती. मीडिया रीपोर्टनुसार या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत अभिनेत्री क्रीती सनॉन दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. अद्याप चित्रपटाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, पण लवकरच या चित्रपटाचे निर्माते (Producers) याची अधिकृत घोषणा करतील असे बोलले जात आहे. मीना कुमारी यांनी आतापर्यंत तब्बल ९० चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातच आता मीना कुमारी यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या बायोपिकमध्ये (Biopic) क्रीतीची अदाकारी पाहता येणार आहे. त्यामुळेच प्रेक्षक या चित्रपटासाठी फार उत्सुक आहेत.

Latest Posts

Don't Miss