spot_img
Friday, February 16, 2024
spot_img

Latest Posts

हिवाळ्यात त्वचा कोरडी होण्यापासून सावध राहायचं असेल तर,संत्री ठरु शकतात फायदेशीर

हिवाळ्यात आपण जसं आपल्या खाण्या-पिण्याची व्यवस्थित काळजी घेतो,तसचं आपण आपल्या चेहऱ्याची देखील काळजी घेतो.

हिवाळ्यात आपण जसं आपल्या खाण्या-पिण्याची व्यवस्थित काळजी घेतो,तसचं आपण आपल्या चेहऱ्याची देखील काळजी घेतो.कारण थंडीमध्ये चेहरा मोठ्या प्रमाणात कोरडा होत असतो.हिवाळ्यामध्ये अनेक हिरव्या पालेभाज्या आणि विविध प्रकारची फळे मार्केटमध्ये येतात. या फळांमध्ये ‘व्हिटॅमीन सी’ ने युक्त असलेले संत्रा हे फळ आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अतिशय लाभदायी आहे. संत्र्याची साल वाळवून त्याच्यापासून अनेक प्रकारचे फेसपॅक्स देखील बनवले जातात.कडाक्याच्या थंडीला नुकतीच सुरूवात झाली आहे. या थंडीचा आपल्या आरोग्यावर आणि त्वचेवर ही परिणाम होतो. त्यामुळे, या दिवसांमध्ये त्वचा अधिक कोरडी पडते. या कोरड्या त्वचेपासून सुटका करून घेण्यासाठी आज आम्ही तुम्हाला संत्र्याच्या सालीपासून बनवल्या जाणाऱ्या फेसपॅक्सची माहिती देणार आहोत. चला तर मग कोरड्या त्वचेची समस्या दूर करणारे संत्र्याच्या सालीचे फेसपॅक्स जाणून घेऊयात.

संत्र्याची साल आणि दूध

संत्र्याच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. हे अँटीऑक्सिडंट्स त्वचेला मॉईश्चराईझ करायला मदत करतात. त्यामुळे, त्वचेतील कोरडेपणा किंवा रूक्षपणा निघून जाण्यास मदत होते.

संत्र्याच्या सालीचा आणि दूधाचा फेसपॅक कसा करायचा ?

हा फेसपॅक बनवण्यासाठी संत्र्याची साल वाळवा. ही साल वाळवून त्यापासून पावडर तयार करा. आता या पावडरमध्ये दूध मिसळा आणि त्याची घट्ट पेस्ट तयार करा. तुमचा फेसपॅक तयार आहे.

आता हा फेसपॅक चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटांसाठी लावा. त्यानंतर, चेहरा धुवून टाका. अधिक चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून २ वेळा या फेसपॅकचा चेहऱ्यावर वापर करा, कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होईल.

संत्र्याची साल आणि दही

आपल्या त्वचेवर ब्लॅकहेड्स येण्यामागचे कारण म्हणजे त्वचेवर वाढलेल्या मृत पेशी होय. त्यामुळे, त्वचेची चमक देखील कमी होते आणि ब्लॅकहेड्सचे प्रमाण देखील वाढते. त्यामुळे, त्वचेवरील या मृत पेशी काढून टाकण्यासाठी तुम्ही संत्र्याच्या सालीची आणि दह्याची मदत घेऊ शकता.

संत्र्याची साल आणि दही यांचा फेसपॅक बनवण्यासाठी संत्र्याची साल वाळवा, त्याची पावडर करा. आता ३ चमचे संत्र्याची पावडर घ्या, त्यामध्ये २ चमचे दही मिसळा  आता तुमचा फेसपॅक तयार आहे. या फेसपॅकने चेहऱ्यावर १५-२० मिनिटे मसाज करा आणि त्यानंतर, चेहरा धुवा.

 

Latest Posts

Don't Miss