Monday, May 20, 2024

Latest Posts

‘जीव माझा गुंतला’ मालिकेचा रिमेक हिंदीमध्ये ?

कलर्स मराठीवरील ही मालिका कन्नड 'मिथुनराशी जी'चा हा मराठी रिमेक आहे. 'जीव माझा गुंतला' या मालिकेचाचा रिमेक गुजराती भाषेत 'राशी रिक्षावाली' या नावाने सुरु आहे.

मुंबई : सध्या मालिकेचा रिमेक होणं ह्यात काही नवं नाही. मालिकेचा विषय, त्याचे कथानक आणि या सगळ्याला मिळणारा प्रतिसाद पाहता मालिकेचा रिमेक होतो. ‘आई कुठे काय करते-अनुपमा’, ‘कुल्की कुमार बाजेवाला’ ‘तुझेच मी गीत गात आहे’, ‘गुम है किसी के प्यार में’ ‘लग्नाची बेडी’ अशा अनेक मालिकांचा रिमेक आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. या यादीमध्ये आता आणखी एका मालिकेची भर पडली आहे. कलर्स मराठीवरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेचा रिमेक आपल्याला पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीला

अंतरा आणि मल्हार या जोडीने अल्पावधितीच प्रेक्षकांची मन जिंकलं. आणि हि जोडी घराघरात पोहचली. मालिकेचा विषय हा अगदी हटके आहे. या मालिकेत रुबाबदार आणि कर्तव्यदक्ष नायक. आणि रिक्षा चालवून घर चालवणारी नायिका. आणि लग्नानंतर हळुवार फुलतं जाणार त्यांचं प्रेम. असा या मालिकेचा मुख्य विषय आहे. नायिकेचं सगळ्यात जास्त प्रेम हे तिच्या रिक्षावर असल्याचे दाखवण्यात आले आहे. मालिकेचं प्रमुख आकर्षण ठरतंय  रिक्षा जिचे नाव ‘हमसफर’ दाखवण्यात आले आहे. मालिकेतील इतर पात्रांच्या भूमिका देखील मालिकेला चार चांद लावतायत. असे या मालिकेचे कथानक आहे.

कलर्स मराठीवरील ही मालिका कन्नड ‘मिथुनराशी जी’चा हा मराठी रिमेक आहे. ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेचाचा रिमेक गुजराती भाषेत ‘राशी रिक्षावाली’ या नावाने सुरु आहे. आता ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेचा हिंदी रिमेक येणार असून त्याचं नाव ‘सावी की सवारी’ आहे. ही मालिका कलर्स टीव्हीवर प्रदर्शित होणार असून. या मालिकेत सावीचे पात्र साकारणारी अभिनेत्री समृद्धी शुक्ला असून, नायकाविषयी अद्याप सांगण्यात आलेलं नाही आता हि मालिका ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेसारखी प्रेक्षकांच्या मनात घर करेल का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Latest Posts

Don't Miss