Friday, July 26, 2024

Latest Posts

‘माझी बहीण स्वतःच्या संसाराला लागली’….,लाडकी बहिण गौतमीच्या लग्नानंतर मृणमयीची भावूक पोस्ट

मराठमोळी अभिनेत्री गौतमी देशमुख आणि स्वानंद तेंडुलकर यांचा विवाहसोहळा २५ डिसेंबर रोजी थाटामाटात पार पडला.  त्यांच्या विवाह सोहळ्याला अनेक त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणींनी आणि कुटुंबानी उपस्थिती लावली होती.दरम्यान गौतमी आणि मृणमयी या दोघी बहिणी मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहेत.नुकतच लाडक्या बहिणीचं लग्न पार पडल्याने मृणमयी भावूक झाली आहे.मृण्मयी देशपांडेनं गौतमीच्या लग्नानंतर नुकतीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान पोस्ट वाचताना आपोआपचं अंगावर शहारे येतात.

मृण्मयीनं गौतमी आणि स्वानंद यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, “अजूनही विश्वास बसत नाहीये की गौतमीचं लग्न झालं. प्रत्येक गोष्टीमध्ये ताई हवी असणारी माझी बहीण स्वतःच्या संसाराला लागली. या क्षणी नक्की काय वाटतंय ते शब्दात सांगता येत नाहीये. आनंद..काळजी..आता ती officially दुसऱ्याची झाली याचं दुःख आणि तिच्या मनासारखा जोडीदार मिळाल्याचा आनंद.. सगळ्याच भावना एकत्र आल्या आहेत… काल परवा पर्यंत ताईचे शेपूट असणार आमचं बाळ ‘संसार’ करताना बघणं मजेचं असणार आहे.. यापुढे आम्हा बहिणींची gossips एकतर्फी नसतील आणि कदाचित तिचा संसार सुरू झाल्यावर ,”ताई तुला माझ्यासाठी वेळच नसतो..” ही तिची तक्रार संपेल.कारण..? तिचं तिलाच कळेल!”

पुढे तिनं पोस्टमध्ये लिहिलं, “स्वानंद. तुझं वेगळं स्वागत करण्याची गरज नाहीये.लग्नाआधीच तू फॅमिली मेंबर झाला होतासच. गौतमी स्वानंदची काळजी घे… स्वानंद गौतमची साथ सोडू नकोस. संसार कोणाचाच सोपा नसतो. पण एक दुसऱ्याचा हात घट्ट पकडलेला असला की कुठल्याही अडचणी वरती मात करता येते.. कदाचित सहज नाही. पण मात करता येते!! एकमेकांवर विश्वास असू द्या.संवाद असू द्या.नातं किंवा प्रेम असंच टिकत नाही त्यासाठी दोघांनीही कष्ट घेण्याची गरज असते. एकमेकांच्या प्रेमात पडण्याची नवीन कारणं शोधत रहा. एकमेकांना सांभाळून घ्या.आता फक्त तुम्ही दोघं नाही आहात दोन्ही कुटुंब एकत्र आली आहेत.सगळ्यांची काळजी घ्या. आणि मी एवढं प्रेमाने बोलून सुद्धा, एवढं छान लिहून सुद्धा वेड्यासारखे वागलात, तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा!!!! लै हनीन”

मृण्मयीने सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करताना मनातल्या भावना व्यक्त करत आपल्या लाडक्या बहिणीला संसार म्हणजे काय आणि प्रेम कसे टिकवायचे याबाबत महत्त्वाचा सल्ला दिला.

Latest Posts

Don't Miss