Monday, May 20, 2024

Latest Posts

हास्यजत्रा फेम ओंकार भोजने आहे “ती” चा फक्त चाहता…

जबरदस्त अभिनयाच्या बळावर छोटा पडदा ते मोठा पडदा असा यशस्वी प्रवास करणारा लोकप्रिय अभिनेता ओंकार भोजने हा चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असतो. तो कायमच प्रेक्षकांना नवं काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून ओंकार घराघरात पोहोचला.

जबरदस्त अभिनयाच्या बळावर छोटा पडदा ते मोठा पडदा असा यशस्वी प्रवास करणारा लोकप्रिय अभिनेता ओंकार भोजने हा चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असतो. तो कायमच प्रेक्षकांना नवं काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधून ओंकार घराघरात पोहोचला. त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. असं म्हणतात ना, की तुमच्या कडे टॅलेंट असेल तर तुम्हाला कशाचीच भीती नाही अगदी तसाच अँकर च्या बाबतीत दिसत. त्याच्या कडे लुक नाही पण त्याच्याकडे फक्त आणि फक्त टॅलेंट आहे म्हणूनच तो त्याच्या स्व कर्तृत्वात या industry मध्ये अगदी कमी वेळात नाव उमटवू शकला. हास्यजत्रामुले तो सगळ्यानच्या मनात अधिराज्य करू लागला मात्र काही कारणामुळे त्याला हास्यजत्रा हा शो सोडावा लागला. आणि हा शो सोडल्याने त्याला अनेकांच्या रागाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर तो झळकला तो ‘सरला एक कोटी’ चित्रपटात. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. आता पुन्हा एकदा ओंकार एका नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘करून गेलो गाव’ या नाटकात तो अभिनेते भाऊ कदम यांच्यासोबत दिसत आहे.

नाटकाचे प्रयोग हाऊसफुल होत असतानाच त्याने नुकतीच एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये त्याने हास्यजत्रेसोबतच, त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक गप्पा मारल्या. याच मुलाखतीत पहिल्यांदाच ओंकारने त्याच्या आयुष्यातील प्रेमाबद्दल सांगितलं. ओंकारने त्याच्या लग्नाबद्दलही खुलासा केला. ओंकारने आपल्या लग्नाची जबाबदारी घरच्यांवर सोपवली आहे. आपल्याला कधीही प्रेम झालं नसल्याचं देखील त्याने सांगितलं. ओंकारला वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारल्यावर तो म्हणाला, ‘प्रेम हे ठरवून होत नाही, मला ते कधी झालं नाही. मी पहिल्यापासूनच या सगळ्या भानगडीत पडलोच नाही. असे त्याने सांगितले. लग्नाची सगळी जबाबदारी घरच्यांनी आणि मित्र परिवारांनी घेतली असल्यामुळे त्याचा विचार करण्याची आता तशी काही गरज नाही.’ तर दुसरीकडे तुला कुणी आवडतं का, तुझी क्रश कोण आहे अशी विचारणा करताच तो म्हणाला, ‘क्रश अशी नाही कुणी पण मला कोकण हार्टेड गर्ल खूप आवडते. तिचा स्वभाव मला खुप आवडतो. ती ज्याप्रकारे काही सामाजिक मुद्दे उचलून धरते, त्या प्रकरणावर बोलते, त्यामुळे तिला फॉलो करायला मला आवडतं.’या सगळ्यात तो तिचा फक्त एक फॅन आहे असं मात्र ओंकारनं आवर्जून सांगितलं. ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता प्रमोद प्रभू-वालावलकर ही सोशल मिडियावरील खुपच लोकप्रिय चेहरा आहे. ती तिचे व्हिडिओ मालवणी भाषेत बनवते. ती तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. आणि म्हणूनच तो तिच्या भाषेच्या आणि तिच्या अंदाजाच्या प्रेमात पडला असावा.

हे ही वाचा : 

संतोष जुवेकरचा नव्या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल

रिलीजच्या दुसऱ्याच दिवशी ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाने केली २५ कोटींची कमाई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss