Parineeti-Raghav चा रॉयल साखरपुडा, गाणं गात दिले सरप्राईज

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने अखेर शनिवारी रात्री नवी दिल्लीत आम आदमी पार्टीचे (आप) नेते राघव चढ्ढा यांच्याशी एंगेजमेंट झाली आहे.

Parineeti-Raghav चा रॉयल साखरपुडा, गाणं गात दिले सरप्राईज

मनोरंजन क्षेत्रातून एक मोठी बातमी ही समोर येत आहे. आपल्या सर्वांचीच लाडकी अभिनेत्री परिणीती चोप्रा ही लवकरच आता लग्नबंधनात अडकली जाणार आहे. आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा या दोघांच्या प्रेमकहाणीची चर्चा ही अनेक दिवसांपासून चालू आहे. तसेच चाहत्यांना देखील या बाबत थोडी चाहूल ही लागली होतच. अखेर दिनांक १३ मे २०२३ रोजी परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा हा पार पडला आहे. बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने अखेर शनिवारी रात्री नवी दिल्लीत आम आदमी पार्टीचे (आप) नेते राघव चढ्ढा यांच्याशी एंगेजमेंट झाली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अनेक राजकारणी मंडळी परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्याला उपस्थित होते. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री आणि परिणीतीची बहिण प्रियांका चोप्रानेदेखील बहिणीच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. १५० पाहुण्यांच्या उपस्थितीत परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा पार पडला आहे. तसेच सध्या परिणीती आणि राघवच्या एंगेजमेंटचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचवेळी, या जोडप्याच्या एंगेजमेंट सेलिब्रेशनचा एक नवीन व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. ज्यामध्ये परिणीती आणि राघव रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.

काही महिन्यांपूर्वी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा पहिल्यांदा मुंबईत लंच आणि डिनर डेटवर एकत्र दिसले होते. यानंतर दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले. दोघेही त्यांच्या समीकरणाबद्दल कधीच बोलले नाहीत, परंतु दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा होत्या. अखेर शनिवारी या जोडप्याने एंगेजमेंट केले.ज्यापर्यंत त्यांच्या लग्नाचा प्रश्न आहे, तर वृत्तांवर विश्वास ठेवला तर दोघेही ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान लग्नाच्या बंधनात अडकू शकतात.

हे ही वाचा : 

कोकण स्पेशिअल चमचमीत फणसाची भाजी माहीत आहे कशी बनवतात? जाणून घ्या आमच्या स्पेशिअल रेसिपी मधून!

न्यू स्टाईलमध्ये बनवा White Sauce Pasta

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version