श्वेता तिवारीचा नवा बॉयफ्रेंड? ३३ वर्षीय अभिनेत्याला करतेय डेट

श्वेता तिवारीचा नवा बॉयफ्रेंड? ३३ वर्षीय अभिनेत्याला करतेय डेट

अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari ) तिच्या कामाबरोबर आयुष्यातमुळे पण चर्चेत असते. श्वेता तिवारी सध्या ३३ वर्षीय अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या अभिनेत्यासोबत ”मेरे डॅड की दुल्हन”मध्ये  या मालिकेत काम केले होते. अभिनेत्री श्वेता तिवारी ही अभिनेता फहमान खानला डेट करत आहे. काही महिन्यांपूर्वी श्वेताच्या दुसऱ्या पतीने सोशल मिडीयावर श्वेता आणि फहमानचा  व्हिडिओ  शेअर केला होता.

नुकत्याच एका मुलाखती दरम्यान फरहमान खानने (Farhmaan Khan ) त्याचे मत मांडले आहे. सहसा मी कोणत्या चर्चांकडे लक्ष देत नाही. एक दिवस मी श्वेताच्या एरियामध्ये होतो. म्हणून मी तिला फोन केला आणि सांगितले मला भेट. मी तिच्या घराच्या इथे गेलो आणि श्वेता मला भेटायला खाली आली. तेव्हा मी आणि श्वेताने एक व्हिडिओ  शूट केला. लोक काय बोलतील याचा मी कधीच विचार केला नाही. कारण मी एक कलाकार आहे माझी चर्चा सगळीकडे होणारचं! यामुळे मी कोणत्याच गोष्टीकडे मी लक्ष देणार नाही. त्यानंतर फरहमान खानने श्वेताचं कौतुक केले.

श्वेता एक उत्तम कलाकार आहे. आम्ही दोघांनी एकत्र मालिकेमध्ये काम केले होते त्यामुळे मला तिच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. ती माझी प्रेरणास्थानी आहे आणि माझी चांगली मैत्रीण आहे. यावेळी त्यांनी फहमानने रिलेशनबदल पण सांगितले आहे. माझे पण एका व्यक्तीशी घनिष्ठनाते  होते पण लॉकडाउनच्या पहिले माझे ब्रेकअप झाले. त्यामुळे सर्वत्र फक्त माझ्या आणि श्वेताच्या नात्याच्या चर्चा होत आहेत, असे फहमानने सांगितले होते.  श्वेता तिवारीचा घटस्फोट झाला आहे. तिला दोन मुलं आहेत श्वेताची मुलगी पण बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चाहते पलकच्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहे. श्वेताची मुलगी पण दिसायला सुंदर आहे.

हे ही वाचा:

वाढत्या उन्हाचा चेहऱ्यावर परिणाम होतोय? मग हा उपाय केलात का?

 महादेव बॅटिंग अँप प्रकरणात ”या” अभिनेत्याला अटक

 Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version