Tuesday, May 21, 2024

Latest Posts

Sushma Andhare यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, अंधारेंसह पायलट सुखरूप

शिवसेना उबाठा गटाच्या (Shivsena UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश (Sushma Andhare Helicopter Crash) झाल्याची माहिती समोर आली आहे. महाडमध्ये हि घटना घडली असून सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप असल्याची माहिती समोर येत आहे. सुषमा अंधारे हेलिकॉप्टर मध्ये बसण्यापूर्वीच हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

आज (शुक्रवार, ३ मे) सुषमा अंधारे या महाडवरुन बारामतीच्या दिशेने निघाल्या असताना हा प्रकार घडला. सकाळी ९.३० वाजता त्या बारामतीच्या दिशेने निघाल्या होत्या. हेलिपॅडवर पोहोचताच त्यांच्या समोरच हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या अपघातात हेलिकॉप्टरचे तुकडे झाले असून पायलट सुरक्षित आहे. स्थानिकांच्या मदतीने पायलटला हेलिकॉप्टरमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. हेलिकॉप्टर क्रॅश चे दृस्य अतिशय भयावह असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या हेलिकॉप्टर क्रॅशबद्दल अधिक माहिती मिळाली असून साधारण नऊच्या सुमारास हे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर आले. हेलिकॉप्टरमध्ये आधीपासूनच काही तांत्रिक अडचणी असल्याचे समजण्यात आले. हेलिकॉप्टर सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी हेलिपॅडवर आले असता बराच वळते हवेत होते. हेलिकॉप्टर उतारावण्यासाठी पायलटकडून बरेच प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, हेलिकॉप्टर उतरवण्याच्या प्रयत्नात ते क्रॅश झाले. या क्रॅशमुळे हेलिकॉप्टरचे तुकडे झाले आहेत. सुषमा अंधारे या सुखरूप असून कोणालाही इजा झाली नसल्याची माहिती मिळत आहे.

सुषमा अंधारे सध्या महाडमध्येच असून त्यांनी मी सुखरूप असल्याचे संगितले आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, “मी सुखरूप आहे. माझ्यासह कॅप्टन आणि असिस्टंट दोघेही सुखरूप आहेत. तसेच माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आणि आम्ही सगळेच सुखरूप आहोत. त्यामुळे, चिंता नसावी.”

हे ही वाचा:

BJP ने वॉशिंग मशीन चिन्हावर निवडणूक लढवावी, Congress प्रवक्ते Sachin Sawant यांचा हल्लाबोल

CM Eknath Shinde आणि Dr. Shrikant Shinde यांच्यात आहे ‘हा’ फरक, काय सांगितलं लता शिंदेंनी ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss