Sunday, May 19, 2024

Latest Posts

योगादिनाचे औचित्य साधत प्राजक्ताने घातले १०८ सूर्यनमस्कार…

प्राजक्ता माळी ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. प्राजक्ताने आपल्या आपल्या उत्तम अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. मात्र तुम्हला माहित आहे का प्राजक्ता माळी ही एक फिटनेस फ्रिक (Fitness Freak) अभिनेत्री आहे.

प्राजक्ता माळी ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. प्राजक्ताने आपल्या आपल्या उत्तम अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. मात्र तुम्हला माहित आहे का प्राजक्ता माळी ही एक फिटनेस फ्रिक (Fitness Freak) अभिनेत्री आहे. प्राजक्ता आपल्या शरीराची योग्य प्रकारे काळजी घेते. प्राजक्ता स्वतःच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. प्राजक्ता ही फिटनेसच्या बाबतीत खबरदारी घेऊन लक्ष देते. प्राजक्ता ही नेहमीच आपल्याला फिटनेच्या बाबतीत टिप्स (Fitness tips) देताना दिसून येते. अनेक मुलाखतींमधून प्राजक्ता फिटनेसबद्दल सांगते. मात्र तुम्हाला माहित आहे का प्राजक्ता ही दरवर्षी योगा दिवसाचे औचीत्य साधून १०८ सूर्यनमस्कार घालते. यावर्षी देखील प्राजक्ताने योगा दिवसाच्या दिवशी १०८ सूर्यनमस्कार घालण्याची परंपरा सुरु ठेवली आहे. असाच एक प्राजक्ताने सूर्यनमस्कार घालतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सध्याचा काळात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. अनेक सेलिब्रिटीज (Celebrities) देखील सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. प्राजक्ता देखील सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. योगादिनानिमित्त प्राजक्ताने सूर्यनमस्कार घालतानाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. सूर्यनमस्कार घालतानाचा व्हिडीओ प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ” सालाबादप्रमाणे यंदाही १०८ सूर्यनमस्कार घातले. हा आहे पुरावा. योगदिनाच्या फक्त तोंडी शुभेच्छा नाहीत.” या व्हिडिओमध्ये प्राजक्ता म्हणते, “सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा, योग दिनानिमित्त आज आपण १०८ सूर्यनमस्कार घालणार आहोत. १२ सूर्यनमस्कार दररोज घाला. फक्त योग दिन आहे म्हणून सूर्यनमस्कार घालू नका. मी योगा करते, त्याचे फायदे मी अनुभवले आहेत. १०८ या आकड्याला भारतात महत्व आहे. आपण जप पण १०८ वेळा करतो. त्यामुळे आपण सूर्यनमस्कार हे १०८ वेळा करणार आहोत. तसेच व्हिडिओमध्ये पुढे प्राजक्ता सांगते की, “मी गेल्या वर्षी १०८ सूर्यनमस्कार घातले होते. आता एक वर्षानंतर मी पुन्हा 108 सूर्यनमस्कार घालत आहे. त्यामुळे थोडी धाकधूक वाट आहे.”

आज म्हणजेच दि. २१ जून रोजी संपूर्ण देशभरात योगा दिवस साजरा केला जातो. अनेक कलाकारही आपल्याला निरोगी आयुष्यासाठी योगा करताना दिसून येतात. प्राजक्ता ही मराठी सिनेसृष्टीतली लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ताचे अनेक चाहते आहेत. सर्वत्र प्राजक्ताच्या अभिनयाचे कौतुक केले आहेत. सध्या प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमधून प्राजक्ता घराघरात पोहोचली. तसेच प्राजक्ताची रानबाजार ही वेबसिरीज देखील सुपरहिट ठरली. प्राजक्ताने अनेक उत्तोमोत्तम भूमिका साकारल्या आहेत.

हे ही वाचा:

जागतिक योग दिवस | International Day of Yoga |

Ashadhi Wari, संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने केला आज २० दिवसांचा टप्पा पूर्ण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss