Wednesday, May 15, 2024

Latest Posts

Priya Bapat Umesh Kamat Love Story, फक्त १८ वर्षांची असताना ‘चॉकलेट बॉय’च्या प्रेमात पडली प्रिया

मराठी मनोरंजनसृष्टीतील सर्वात क्यूटआणि रोमँटिक जोडी म्हणून प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामतची (Umesh Kamat) यांची ओळख आहे.

मराठी मनोरंजनसृष्टीतील सर्वात क्यूटआणि रोमँटिक जोडी म्हणून प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामतची (Umesh Kamat) यांची ओळख आहे. अनेकांच्या मनात या दोघांनी घर केले आहे. प्रिया बापट आणि उमेश कामत यांचा खूप मोठा चााहतावर्ग आहे. तब्बल ६ वर्ष प्रिया आणि उमेश हे दोघेही एकमेकांना डेट करत होते. आणि त्यांनतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु तुम्हाला या दोघांच्या लव्ह स्टोरी बद्दल माहित आहे का?

तेव्हाच्या काळी ‘चॉकलेट बॉय’ म्हणून लोकप्रिय असलेला उमेश कामात हा छोटा पडदा गाजवत होता. आणि त्याच वेळी प्रिया बापट ही त्याच्या प्रेमात पडली. प्रिया आणि उमेश या दोघांच्याही वयात ८ वर्षांचं अंतर आहे. ती शाळेत असल्यापासूनच उमेशची मोठी चाहती होती. पुढे बारावीत असताना ती उमेश कामतच्या प्रेमात पडली. जेव्हा अभिनेत्री प्रिया बापट ही उमेश कामातच्या प्रेमात पडली तेव्हा तीच वय हे फक्त १८ होते. तर त्यांच्या या नात्याला नंतर घरातून देखील विरोध हा झाला होता. परंतु प्रियाने उमेशला कसं प्रपोज केलं हे माहित आहे का ?.

प्रिया आणि उमेश हे दोघेही एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. हे दोघेही खूप चांगले मित्र होत आणि नंतर त्यांच्या या मैत्रीचं रूपांतर हळू हळू प्रेमात झाले आहे. प्रिया बापटने उमेश कामतला प्रपोज केलं आहे. ८ ऑगस्ट रोजी प्रिया बापटने उमेश कामतला प्रपोज केलं. पण त्यावेळी उमेशने प्रियाने काहीही उत्तर दिलं नव्हतं. १८ सप्टेंबरला उमेशच्या वाढदिवशी उमेशने तिला होकार दिला होता. पुढे २०११ साली ते लग्नबंधनात अडकले. प्रियाने उमेशचा नंबर ‘बंड्या’ या नावाने सेव्ह केला होता. अनेक प्रोजेक्टमध्ये प्रिया आणि उमेश एकत्र झळकले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी ‘आणि काय हवं’ ही त्यांची सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

हे ही वाचा:

१ जुलैला आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मनपावर विराट मोर्चा

सोशल मीडियावर अनेक मनसेच्या कार्यकर्त्यांचे नवे अवतार व्हायरल

पुण्यामध्ये हल्ला झालेल्या घटनेवरून अजित पवार संतापले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss