Tuesday, May 21, 2024

Latest Posts

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विलंब होण्याची ही आहेत कारणं…

ब्रम्हास्त्र चित्रपट सप्टेंबर महिन्यात थिएटर मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.

मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त कोणत्या चित्रपटाची चर्चा असेल तर ती म्हणजे, रणबीर कपूर आणि आलीय भट्ट यांच्यावर चित्रित झालेल्या ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमाची. या चित्रपटाबाबतची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटाच्या चित्रीकरणाला तब्ब्ल पाच वर्षे लागली असं सांगिलंय जातंय. याचे कारण रणबीरने एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

 

‘खरं सांगायचं तर ब्रह्मास्त्रला झालेला विलंब इतर कोणत्याही कारणामुळे नसून चित्रपटाच्या कथेमुळे झाला आहे. आमचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट वेगळ्या पार्श्वभूमीवर बनत आहे आणि त्यासाठी वेळ लागणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो 100, 200 किंवा 40 दिवसात बनवणं, त्याचा परिणाम कसा होईल, पण ब्रह्मास्त्राच्या विलंबात मी म्हणेन की यात कोरोनाचीही महत्त्वाची भूमिका आहे.

 

‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले असून चित्रपटाचा ट्रेलरही तुफान गाजतोय. चित्रपटाचे कथानक शिवा नावाच्या व्यक्तीभोवती फिरताना दिसणार आहे. यात असं दाखवलं जाईल की मुख्य नायकाकडे एक दिव्य शक्ती आहे. ज्याबद्दल त्याला स्वतःला माहित नसते. काही वेळानंतर शिव म्हणजेच कथेतील मुख्य नायक त्याला त्याच्या या दिव्य कथेची जाणीव होते. आणि पुढे कथानक रंजक पद्धतीने वळण घेते. अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्या विशेष भूमिका चित्रपटात पाहायला मिळतील. ब्रम्हास्त्र चित्रपट सप्टेंबर महिन्यात थिएटर मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.

Latest Posts

Don't Miss