Saturday, May 18, 2024

Latest Posts

रितेश देशमुखनं दिग्दर्शित केलंल्या पहिल्या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण, इंस्टाग्राम हॅण्डलवरून दिली माहिती

बॉलीवुडमधील मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख हा त्याच्या सोशल मीडिया वर सतत सक्रिय अस्तो. त्यातच आज त्याने त्याच्या इंस्टाग्राम हँडल वरून एक बातमी दिली आहे.

बॉलीवुडमधील मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख हा त्याच्या सोशल मीडिया वर सतत सक्रिय अस्तो. त्यातच आज त्याने त्याच्या इंस्टाग्राम हँडल वरून एक बातमी दिली आहे.

 रितेश देशमुखने सर्व प्रथम त्याच्या चाहत्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. व पुढे म्हटले की, “पांडुरंगाच्या साक्षीने मी मराठी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आज त्याच विठूमाऊलीच्या आषाढीला सांगतांना अतिशय आनंद होतोय की मी दिग्दर्शित केलेल्या पहिल्या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे . अनेक अडचणीतून मार्ग काढत मी आणि माझ्या टीमने पहिला टप्पा यशस्वीपणे गाठला आहे आणि आता पुढचा पूर्णत्वाचा प्रवास आणखी बरंच शिकवणारा असणार आहे पण जर तुमच्या पाठीशी तुमची जिवाभावाची माणसं असतील तर हा प्रवास आणखी सोपा होतो. अशाच एका जिवाभावाच्या माणसाची साथ आमच्या चित्रपटाला लाभली ते म्हणजे ‘सलमान भाऊ’ . माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाला भाऊंनी #लईभारी साथ दिली होती आता भाऊने माझ्या पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटात आणखी एक #वेड केलंय.
थॅक्यु भाऊ. लव यू, तुम्हा सर्वांच्या सदिच्छांमुळे वेड पूर्ण झाला आहे.आणि आता… वेडेपणा सुरु होणार आहे. तेव्हा भेटूया लवकरच…” असे त्या पोस्ट मध्ये रितेशने म्हटले आहे.

2014 साली ‘लय भारी’ चित्रपटातून रितेश देशमुख यांनी मराठी चित्रपटसृष्टी मध्ये पदार्पण केले होते. रितेश देशमुख यांच्या पहिल्या वहिल्या अशा मराठी चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. त्याच मागोमाग 2018 साली लय भारी चित्रपटाचा दुसरा पर्व प्रदर्शित करण्यात आला. या ‘माऊली’ चित्रपटाला सुद्धा रितेश देशमुखच्या चाहत्यांनी त्याच्या डबल रोलला भरभरून प्रतिसाद दिला.

लय भारी चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान याची झलक पाहायला मिळाली होती. आताच्या रितेश देशमुख यांच्या पोस्टमध्ये सलमान खानचा देखील उल्लेख आहे. रितेश देशमुखच्या चाहत्यांन बरोबरच सलमान खानच्या चाहत्यांसाठी देखील उत्सुकतेची बाब ठरणार आहे. रितेश देशमुखच्या या नव्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होऊन. पुढील टप्प्यासाठी रितेश देशमुख यांनी प्रेक्षकांच्या सदिच्छा मागितले आहेत.

हेही वाचा : 

आदित्य ठाकरेंची मुंबईती निष्ठा यात्रा, शिवसैनिकांशी साधणार संवाद

Latest Posts

Don't Miss